पदाधिकार्यांची चौथ्यांदा बिनविरोध निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- आपुलकी मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गोरेगाव (ता. पारनेर) येथील श्री गोरेश्वर मंदिरात ही सभा घेण्यात आली.
या सभेत मंडळाच्या अध्यक्षपदी मेजर बापू तांबे, उपाध्यक्षपदी रावसाहेब तांबे, सचिवपदी श्रीकांत नरसाळे यांची बिनविरोध चौथ्यांदा निवड करण्यात आली. आपुलकी मित्र मंडळाची चार वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली असून, मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. तसेच सदस्यांच्या आर्थिक गरजा देखील भागविण्यात येतात.
दिवाळी निमित्ताने झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना भेटवस्तू व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी मंडळाचे रामदास नरसाळे, जयराम तांबे, संतोष नरसाळे, साहेबराव नरसाळे, रघुनाथ चौरे, संपत नरसाळे, दशरथ थोरात, भरत तांबे, गणेश नरसाळे, भाऊसाहेब तांबे, त्रिभुवन लष्करे आदी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन जयराम तांबे यांनी केले. आभार संतोष नरसाळे यांनी मानले.