• Fri. Mar 14th, 2025

अहमदनगर शहरातून असे दिसले खंडग्रास सूर्यग्रहण

ByMirror

Oct 25, 2022

दीपावलीत सूर्यग्रहण दिसण्याचा 27 वर्षानंतर आला होता योग

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सोमवारी रात्री दिवाळीच्या आतषबाजींची रोषणाई तर मंगळवारी संध्याकाळी खंडग्रास सूर्यग्रहणाच्या रोषणाईचा अनोखा संगम नगरकरांना अनुभवता आला. हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतासह आशिया खंडाचा पश्‍चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप आणि आफ्रिका खंडाच्या काही भागातून दिसले. खंडग्रास सूर्यग्रहणाच्या विविध छटा दुर्बिण व इतर साधनांनी पाहता आल्या.

Photo credit: Raju Shaikh


अहमदनगर शहरातून दुपारी 4:40 वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ झाले. ग्रहण मध्य सायंकाळी 5.45 वाजता दिसले. यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकला होता. ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी 6:03 वाजता सूर्यास्त झाला. त्यानंतर सहा वाजून 31 मिनिटांनी ग्रहणाचा मोक्ष झाला. भारतातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेनुसार सूर्यग्रहण दिसले.


या वर्षातले हे शेवटचे ग्रहण असल्याने खगोलप्रेमी व छायाचित्रकारांसाठी ही पर्वणी ठरली. पुढील सूर्यग्रहण पाच वर्षांनी म्हणजेच 2 ऑगस्ट 2027 मध्ये दिसणार आहे. भारतात दीपावलीच्या दिवशी सूर्यग्रहण दिसण्याचा योग 27 वर्षानंतर आला होता. यापूर्वी हे ग्रहण 24 ऑक्टोबर 1995 ला दीपावलीत दिसले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *