• Sat. Nov 1st, 2025

जन शिक्षण संस्थेत महिलांसह युवतींचे योगासने

ByMirror

Jun 21, 2024

आंतरराष्ट्रीय योग दिवसचा उपक्रम

जीवनातील तणाव कमी करण्यासाठी योग व प्राणायाम उपयुक्त -बाळासाहेब पवार

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालय संचलित नालेगाव येथील जन शिक्षण संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेत झालेल्या योग कार्यक्रमात युवतींसह महिलांनी सहभाग नोंदवून योग व प्राणायामाचे धडे गिरवले.


निरोगी जीवनाचा संदेश देत हा उपक्रम पार पडला. यावेळी जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार यांनी निरोगी जीवनासाठी योग व प्राणायामाचे महत्त्व सांगून उपस्थित युवती, महिलांकडून योगासने प्रात्यक्षिकासह करुन घेतली. यावेळी कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, प्रशिक्षिका मंगल चौधरी, लेखापाल अनिल तांदळे आदींसह प्रशिक्षिका, महिला व युवती उपस्थित होत्या.


बाळासाहेब पवार यांनी योगाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता वाढते. जीवनातील तणाव कमी करण्यासाठी योग व प्राणायाम उपयुक्त ठरत असल्याचे स्पष्ट करुन जनशिक्षण संस्थेत 2005 पासून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरु असलेल्या महिलांच्या व्यावसायिक प्रशिक्षण कोर्सची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *