राष्ट्रवादी युवती सेलचा उपक्रम
समाजाच्या सर्वांगीन प्रगतीसाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या सर्वांगीन प्रगतीसाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे ठरत आहे. समाज घडविण्यापासून ते संस्कार रुजविण्यापर्यंत महिला कार्य करत आहे. अनेक क्षेत्रात महिला यशोशिखरावर आहेत. प्रत्येक पुरुषाच्या यशामागे एक महिला असते. चुल आणि मूलच्या पलीकडे जावून वेगवेगळ्या क्षेत्रात महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी युवती सेलच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील महिला शिक्षिका, प्राध्यापिका व मुख्याध्यापिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार जगताप बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, राष्ट्रवादी युवतीच्या शहर जिल्हाध्यक्षा ॲड. अंजली आव्हाड, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, क्रीडा सेलचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप, साधनाताई बोरुडे, दीपालीताई आढाव, योगिता कुडिया, विद्या सोनवणे, स्नेह चव्हाण, कीर्ती गुरप, कार्तिकी बोधले, प्रेमा जावळे, कल्पना गुगळे आदींसह युवती सेलच्या पदाधिकारी व महिला शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
पुढे आमदार जगताप म्हणाले की, महिला शिक्षिका सक्षम समाज उभारणीचे काम करत आहे. पिढी घडविण्यासह त्यांच्यात संस्कार ते रुजवित आहे. समाजासाठी महिलांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
अंजली आव्हाड म्हणाल्या की, समाजात प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला कार्य करत आहेत. राज्यात महिला धोरण लागू झाल्याने महिलांचा सन्मान आनखी वाढला आहे. समाजात पिढी घडविणाऱ्या महिला शिक्षिकांचा सन्मान करुन वेगळ्या पध्दतीने महिला दिन साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या माध्यमातून वेळोवेळी सत्कार व सन्मान करुन नेहमीच प्रोत्साहन देण्याचे काम करण्यात आल्याचे उपस्थित शिक्षिकांनी भावना व्यक्त केल्या.