• Fri. Sep 19th, 2025

मनोज जरांगे पाटील यांचे शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत

ByMirror

Aug 13, 2024

मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीस पाणी वाटप

मराठा व मुस्लिम समाज बांधवांनी केला शिवाजी महाराजांचा एकच जयघोष

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातून सोमवारी (दि.12 ऑगस्ट) निघालेल्या मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीचे माणिक चौक येथे मुस्लिम समाजाच्या वतीने स्वागत करुन, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.


तर रॅलीत सहभागी झालेल्या मराठा बांधवांना मुस्लिम समाजाच्या वतीने पाणीच्या बॉटलचे वाटप करण्यात आले. यावेळी हाजी मन्सूर शेख, तब्लीक जमातचे प्रमुख अब्दुस सलाम, सामाजिक कार्यकर्ते मुजाहिद (भा) कुरेशी, नगरसेवक समद खान, उबेद शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, सामाजिक कार्यकर्ते मतीन सय्यद, खालिद शेख, विश्‍व मानवाधिकार परिषदचे प्रदेशाध्यक्ष नवेद शेख, सुफियान शेख, आरिफ पटेल, सरफराज कुरेशी आदींसह मुस्लिम समाजातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मराठा व मुस्लिम समाज बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकच जयघोष करुन एक मराठा लाख मराठा! च्या घोषणा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *