• Tue. Apr 14th, 2026

प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांचे स्वागत

ByMirror

Apr 13, 2026

कौटुंबिक न्यायालय वकील संघाकडून सत्कार;


जनतेला न्याय मिळण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्‍यकता -न्यायाधीश शिवाजीराव कचरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर येथे नव्याने बदली होऊन आलेले प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांचे कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले. या स्वागत समारंभात न्यायाधीश कचरे यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


या प्रसंगी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड. लक्ष्मण कचरे यांच्या हस्ते न्यायाधीश कचरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजी कराळे, उपाध्यक्ष ॲड. सुरेश लगड, कार्याध्यक्ष ॲड. शिवाजी सांगळे, सचिव ॲड. राजेश कावरे, महिला सचिव ॲड. अनिता दिघे, माजी उपाध्यक्ष ॲड. आर. आर. शिर्के तसेच ॲड. वैभव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.


न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांनीही वकील संघाच्या स्वागताबद्दल आभार मानले. न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जनतेसाठी न्याय सहज उपलब्ध व्हावा, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्‍यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात न्यायव्यवस्थेतील कामकाज अधिक प्रभावी आणि सुलभ व्हावे, तसेच न्यायालयीन प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग वाढावा, यासाठी बेंच आणि बार यामध्ये समन्वय साधला जात असल्याचे उपस्थित वकिलांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *