रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाच्या शालेय वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा
नगर (प्रतिनिधी)- नागपूर येथे रेणूका शिक्षण प्रसारक मंडळाच्या रामराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिंडीत श्री विठ्ठल रुख्मिणी, ज्ञानेश्वर माऊली यांच्या वेशभूषेत असलेल्या दिंडीतील चिमुकल्यांनी परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, विठू नामाच्या जय घोषात, पारंपरिक वारकऱ्यांच्या वेशभूषेत हातात भगवे ध्वज घेतलेले विद्यार्थी उत्स्फूर्तपणे दिंडीत सहभागी झाले होते. या दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले ते बाल वारकऱ्यांचा रिंगण सोहळा, या रिंगण सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले.शाळेपासून माताजीनगर मार्गे एम ब्लॉक तसेच संभाजीनगर मधून पुन्हा शाळेपर्यंत पायी दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेतले होते. दिंडीत विद्यार्थ्यांसह पालक देखील सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्राची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायची माहिती सांगण्यात आली. माताजीनगर मधील नागरिक तसेच पालकांकडून दिंडीतील बाल वारकऱ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
दिंडीचे प्रारंभ श्री विठ्ठल रुख्मिणी मूर्तिचे पूजन करून करण्यात आले. ठिकठिकाणी ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करून पालखीची पूजा केली. कार्यक्रमासाठी संस्थचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक शिवाजीराव घाडगे, पर्यवेक्षक दत्तात्रय दरेकर, नंदा दुधाने, संतोष उरमुडे, केशव गुंजाळ, जगदीश आव्हाड, राजेंद्र शिंदे, कैलास उमाप, राजकुमार इटेवाड, सुनंदा शिरसाठ, उल्का गवते, नितीन घाडगे, दीपक कळसे, राजू नरोडे, नितीन शिंदे, अभिषेक सांगळे, म्हस्के आदींसह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.