समाज निर्वाण यांच्या पाठिशी एकवटणार असल्याचा विश्वास
उमेदवारी करण्याची कार्यकर्त्यांमधून मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाच्या विकासासाठी विश्वनाथ निर्वाण यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अथवा श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणपत घनदाट यांनी केली आहे. निर्वाण यांच्या सामाजिक कार्याची तळमळ व सामाजिक विकासाचा दृष्टीकोन पाहून सर्व बहुजन समाज बांधव त्यांच्या पाठिशी एकवटणार असल्याचा विश्वास घनदाट यांनी व्यक्त केला आहे.
माजी प्रशासकीय अधिकारी तथा महावितरणचे कॅफो राहिलेले विश्वनाथ निर्वाण अनेक वर्षापासून निस्वार्थ भावनेने सामाजिक योगदान देत आहे. समाजात त्यांचा दांडगा जनसंर्पक असून, समाजकारणात त्यांनी स्वत:ला वाहून घेतले आहे. तळगाळापर्यंत त्यांचे सामाजिक कार्य सुरु आहे. तर अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे त्यांनी कार्य केले आहे. समाजाला त्यांच्या नेतृत्वाची गरज असून, ते निवडणुकीत उभे राहिल्यास सर्व समाज बांधव त्यांच्या पाठिशी राहणार असल्याचे घनदाट यांनी म्हंटले आहे.
निर्वाण यांनी कोणत्याही पक्षाकडून अथवा अपक्ष उमेदवारी करावी. शिर्डी लोकसभा व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार न मिळाल्याने समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबीत राहिले आहे. निर्वाण हे सर्व समाजाला बरोबर घेवून विकासात्मक वाटचाल करणार आहे. तर केंद्र व राज्याच्या कल्याणकारी योजना राबविण्याचा त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या नेतृत्वाने समाजाचा विकास साधला जाणार असल्याचे घनदाट यांनी स्पष्ट केले आहे.
