पारनेर तालुका सैनिक बँकेच्या कर्जत शाखेतील 1 कोटी 79 लाख अफरातफर प्रकरण
स्टेटस वर पत्र व्हायरल करत संचालकांवर पैसे घेतल्याचा फरांडेचा आरोप
वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेत तत्कालीन शाखा व्यवस्थापक सदाशिव फरांडे याने व इतर कर्मचारी यांनी चेक क्लिअरिंग प्रकरणात 1 कोटी 79 लाख रुपये अफरातफर केल्याचे उघडकीस आले असताना, या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी मागील तीन महिन्यापासून धडपड करणाऱ्या फरांडेचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपिठाच्या उच्च न्यायालयाने फेटाळल्याने, गुरुवारी पत्रकार परिषद घेवून स्वत: पोलीसांना शरण गेला असल्याची माहिती विनायक गोस्वामी यांनी दिली.
उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याने फरांडे याला कोणत्याही क्षणी अटक झाली असती. मात्र त्याने पत्रकार परिषदेत सैनिक बँकेच्या संचालकांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभे करत व पोलिसांच्या कार्यक्षेमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन स्वत: अटक होत असल्याचे भासवत आहे. दरम्यान सदर प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे असून, यात आता पर्यंत 4 आरोपी अटक केले आहेत. तर अजून 2 आरोपी फरार आहेत व आणखी काही आरोपी तपासात समोर येणार आहेत. या प्रकरणात काही पदाधिकारी सामील असण्याची दाट शक्यता असल्याचा आरोपही सदाशिव फरांडे यानी स्टेटस ठेवून केला आहे.
सदाशिव फरांडे हा या प्रकरणात सहीसलामत सुटावा म्हणून कर्जत पोलीस स्टेशनमध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी खरी माहिती दडवत लिपिकावर गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी आता फरांडे याला अटक केली असून, सदर घोटाळ्यात कोण-कोण सामिल होते? याचा तपास पोलिस लावतील इतर दोषींनाही आरोपी करतील असा विश्वास गोस्वामी यांनी व्यक्त केला आहे.
आरोपी सदाशिव फरांडेनी आणला साळसूद पणाचा आव
गेले तीन महिने सदाशिव फरांडे फरार असून, त्याने जामीन मिळावा म्हणून उच्च न्यायालयात दोनदा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळत अटक करण्याची पोलिसांना आदेश दिला. हतबल होऊन फरांडे याने कर्जतला पत्रकार परिषद घेत साळसूदपणाचा आव आणला व मला बँक संचालकांनी अडकवण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पत्रात फरांडे म्हणतो की, तत्कालीन व विद्यमान संचालक यांना नितीन मेहेर यांचेकडून 1 कोटी 79 लाख रक्कमेतून लाभ मिळाला आहे. आणि माझ्याकडून हि लाभाची अपेक्षा करत आहे असे आरोप पत्र बँकेच्या मोबाईल नंबर वरुन स्टेटस ठेवत व्हायरल केले. मला पोलिसांनी अटक केली नसून मीच स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाल्याचे सांगत आहे. -विनायक गोस्वामी
