• Wed. Dec 31st, 2025

नगर तालुका विविध कार्यकारी सोसायटीच्या पर्यवेक्षकपदी विजय सोनवणे यांची नियुक्ती

ByMirror

Dec 24, 2025

निमगाव वाघा येथे डोंगरे संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सत्कार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव विजय हरीभाऊ सोनवणे यांची नगर तालुका विविध कार्यकारी सोसायटीच्या पर्यवेक्षकपदी (सुपरवायझर) नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.


या कार्यक्रमात डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते विजय सोनवणे यांचा सत्कार पार पडला. यावेळी सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निमगाव वाघा शाखा अधिकारी राम कासार, तुळशीराम बोरुडे, प्रताप कार्ले, बाळासाहेब साठे, अर्जून ठुबे, कांता ठुबे, गोरख चौरे, वैभव पवार, पांडूरंग केदार आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, विजय सोनवणे यांनी सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणा, पारदर्शकता व कार्यक्षमतेने काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सचिव पदावर असताना त्यांनी सभासदांच्या अडचणी समजून घेत संस्था सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांची झालेली निवड ही त्यांच्या कार्याची पावती असून, त्यांच्या अनुभवाचा व कार्यकौशल्याचा लाभ नगर तालुका विविध कार्यकारी सोसायटीला नक्कीच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


सत्काराला उत्तर देताना विजय सोनवणे म्हणाले की, माझ्यावर सोपविण्यात आलेली ही जबाबदारी ही माझ्यासाठी सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. सहकार चळवळ बळकट करण्यासाठी, सभासदांचे हित जपण्यासाठी आणि संस्थांमध्ये पारदर्शक कारभार राबवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *