साहित्य व काव्य क्षेत्रातील कार्याबद्दल गौरव
नगर (प्रतिनिधी)- साहित्य क्षेत्रात सातत्याने करीत असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नगरच्या लेखिका तथा कवयित्री विद्या रामभाऊ भडके यांना अष्टपैलू साहित्य भूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती कला अकादमी आणि न्यायप्रभातच्या वतीने आळंदी देवाची (ता. खेड, जि. पुणे) या ठिकाणी झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात भडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अकादमीचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी खैरे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर, अनुसया खैरे, रितेश अत्तरदे, नंदश्री मठपती, सविता पाटील, अश्विनी कसबेकर, अनिता जगताप, उज्वला बुरुंगले, मुद्रिका शिंदे, रागिणी अत्तरदे, निलेश कसबेकर, प्रताप पाटील, ह.भ.प. प्रल्हाद सुपेकर महाराज, रमेश देवरे, अलका झरेकर, अरुणा कालेकर आदी उपस्थित होते.
लेखिका तथा कवयित्री विद्या भडके नागरदेवळे (ता. नगर) येथील रहिवासी असून, त्या शिवाजी हायस्कूल बोधेगाव (ता. शेवगाव) येथे शिक्षिका म्हणून विद्यादानाचे कार्य करत आहेत. भडके यांचे साहित्य तसेच काव्य लेखनात असलेले उत्कृष्ट कार्य. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना अष्टपैलू साहित्यभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
विद्या भडके यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक गोसावी, पर्यवेक्षक मोरे, विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच भाऊसाहेब पानमळकर, पोपट बनकर, प्रा. सिताराम जाधव, प्रा. अश्विनी विधाते, अनिल धाडगे, संजय भडके, ॲड. महेश शिंदे, शर्मिला गोसावी, स्वाती बनकर, भाऊसाहेब कासार यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.