• Wed. Oct 15th, 2025

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर

ByMirror

Jan 2, 2025

निमगाव वाघा येथील काव्य संमेलनात होणार पुरस्काराचे वितरण

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (दि.12 जानेवारी) होणाऱ्या सातव्या काव्य संमेलनात स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सदर पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याची माहिती काव्य संमेलनाचे संयोजक तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.


पारनेर तालुक्यातील ज्ञानदेव लंके गुरुजी यांना जीवन गौरव, सौ. शकुंतला लंके यांना राजमाता जिजाऊ नारी शक्ती, तर माजी प्राचार्य सुभानजी खैरे यांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच टी.एस. उर्फ बाळासाहेब देशमुख (श्रीगोंदा), अमोल बास्कर (नगर), गिरीजा भुमरे (संभाजीनगर), अहमद पीरसहाब शेख (हिंगोली), भारत सातपुते (लातूर), हेमलता पाटील (नगर), सुचेता भिसे (नगर तालुका), कल्पना दबडे (सांगली), सविता शिंदे (शेवगाव), सुहास देवराज (जळगाव), अरुणा देवराज (जळगाव), मनिषा गायकवाड (भिंगार), भारती डमाळे (नगर), हेमलता गीते (नगर), सरोज आल्हाट (नगर), संगीता घोडके (नगर), सुनिता दहातोंडे (नेवासा), चंद्रकांत सांगळे (श्रीगोंदा), विजया पाटील (जळगाव), फारुक शेख (बुलढाणा), फरीदा खानम (अकोला), मोहंमद रफीक शेर मोहंमद (बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश), शगुफ्ता खानम (बुलढाणा), विजय आरोटे (नगर), अनंत कराड (बीड), मंदाबाई तरटे (श्रीगोंदा), अशोक भालके (नेवासा), गोदावरी द्याडे (पुणे), बस्वराज द्याडे (पुणे), ओवी काळे (श्रीरामपूर), अविनाश साठे (नगर) या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार जाहीर झाला आहे.


काव्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार निलेश लंके, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, कार्याध्यक्ष कवियत्री सरोज आल्हाट, प्रमुख अतिथी जि.प. शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, संमेलनाच्या अध्यक्षा अनिता काळे, माजी अध्यक्ष ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे, कवी गिताराम नरवडे, गझलकार रज्जाक शेख, माजी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे, कवी आनंदा साळवे, मा. प्रा. शंकरराव चव्हाण, प्राचार्या गुंफाताई कोकाटे, मिराबक्ष शेख, डॉ. सुलभा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे.


काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा यशस्वी होण्यासाठी युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, सचिन जाधव, गौतम फलके, अक्षय ठाणगे, ऋषीकेश बोडखे, छाया वाबळे, कांता वाबळे, किरण ठाणगे, देविदास आंबेकर, प्रियंका डोंगरे-ठाणगे प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *