• Tue. Jul 8th, 2025

वंचित बहुजन आघाडीचे मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर धरणे आंदोलन

ByMirror

Jul 8, 2025

नाईकवाडी खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी

पाठपुरावा करुन देखील योग्य तपास होत नसल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- वैभव शिवाजी नाईकवाडी या युवकाच्या अमानुष खुन प्रकरण सीआयडी कडे वर्ग करावा आणि आरोपी व आरोपीशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची नार्कोटेस्ट करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर मंगळवारी (दि.8 जुलै) बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांनी दिला आहे.


काही महिन्यांपूर्वी वैभव नाईकवाडी याचे अपहरण करून त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी मृतदेह केतकाई परिसरात नेऊन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने जाळून टाकला. विशेष म्हणजे या मारहाणीचे फोटो व व्हिडीओ आरोपींनी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याला पाठवले होते. तरीही पोलिस अधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन निवांत बसून राहिले. अन्यथा वैभवचा जीव वाचू शकला असता. वैभवच्या अपहरणाच्या दिवशी त्याच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु त्या ठाण्यातूनही कोणतीच ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे दोन पोलिस ठाण्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रीयतेमुळे एका अल्पवयीन मुलाचा बळी गेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


या प्रकरणाची पोलीस प्रशासन गांभीर्याने दखल घेत नसल्याने आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनिफ शेख, युवक शहराध्यक्ष ॲड. योगेश गुंजाळ, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, गणेश राऊत, वरून हरबा, बाळासाहेब कोतकर, प्रमोद भिंगारदिवे, विश्‍वास वागस्कर आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *