• Sat. Mar 15th, 2025

शहरातील या मुख्य रस्त्याचे श्री जिव्हेश्‍वर मार्ग नामकरण फलकाचे अनावरण

ByMirror

Aug 9, 2024

भगवान श्री जिव्हेश्‍वरांचे प्रमुख मार्गाला नाव शहरासाठी भुषणावह -बाळासाहेब बोराटे

अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण जगाच्या लज्जारक्षणाचे कार्य करणारे आद्यवस्त्रनिर्माते व स्वकुळसाळी समाजाचे आराध्यदैवत भगवान श्री जिव्हेश्‍वर यांचे नाव शहरातील प्रमुख मार्गाला देणे ही शहरासाठी भुषणावह बाब आहे. या नावाने त्यांचे विचार व कार्य समाजात प्रेरणा देणारे ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.


शहरातील नेता सुभाष चौक ते सिताराम सारडा स्कूल या मार्गाला महापालिकेच्या वतीने श्री जिव्हेश्‍वर मार्ग नामकरण करण्यात आले असून, या रस्त्याच्या नावाच्या फलकाचे अनावरण विणकर दिनाचे (राष्ट्रीय हातमाग दिन) औचित्य साधून शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम व युवा सेनेचे सहसचिव विक्रम राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोराटे बोलत होते.

याप्रसंगी माजी उपमहापौर मालनताई ढोणे, स्वकुळ साळी हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष अरविंद धिरडे, दिपक सुळ, माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव, संतोष गेनाप्पा, अजय चितळे, सचिन जाधव, परेश लोखंडे, संजय झिंजे, जय जिव्हेश्‍वर प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश झिंजे, अध्यक्ष किरण डफळ, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर पातळे, विश्‍वस्त अभिजित अष्टेकर, गणेश दळवी, अनिल भंडारे, नरेश कांबळे, जितेंद्र लांडगे, अनिल भंडारे, प्रदीप दळवी, किशोर विंचुरकर, प्रशांत भंडारे, योगेश पांढरपोटे, सुमित धेंड, चेतन कांबळे, रोहन आकडे, श्रावण सदाफुले, वनिता पाटेकर, शुभदा वल्ली, छाया साळी, अमृता कांबळे आदींसह जय जिव्हेश्‍वर प्रतिष्ठानचे सर्व सभासद व सकल हिंदु स्वकुळसाळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मागील वर्षी जय जिव्हेश्‍वर प्रतिष्ठान आणि सकल हिंदु स्वकुळसाळी समाजाच्या वतीने बागडपट्टीतील नेता सुभाष चौक ते सिताराम सारडा या मार्गाला भगवान श्री जिव्हेश्‍वर मार्ग असे नाव देण्यात यावे, यासाठी आयुक्त आणि महापौर यांना निवेदन देण्यात आले होते. 25 सप्टेंबर 2023 रोजी मनपात माजी उपमहापौर मालनताई ढोणे यांनी बागडपट्टी येथील मार्गाला स्वकुळ साळी समाजाचे आराध्यदैवत भगवान श्री जिव्हेश्‍वर मार्ग नाव देण्याचा ठराव मांडला. यास महापौर रोहिणी शेंडगे यांनी अनुमोदन दिले व सभापती गणेश कवडे अनुसुचक होते. तसेच सभागृहातील सर्व नगरसेवकांनी समर्थन देऊन त्यास मंजूरी दिली होती. याबद्दल सर्व नगरसेवक व मनपा प्रशासनाचे सकल हिंदु स्वकुळसाळी समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *