• Wed. Feb 18th, 2026

17 वर्षा आतील महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा मुला-मुलींची सांघिक स्पर्धा रंगली

ByMirror

Jul 9, 2024

उपांत्य फेरीत मुलींमध्ये पुणे, रायगड व मुलांमध्ये ठाणे, पालघर संघाची आगेकुच

अहमदनगर (प्रतिनिधी)- बॅटलडोर बॅडमिंटन अकॅडमीच्या वतीने कै. श्रीमती संजीवनी कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉलमध्ये 17 वर्षा आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा आणि 15 वर्ष आतील मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा रंगली आहे. या स्पर्धेत विविध जिल्ह्यातील संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण करुन विजयासाठी कौशल्य पणाला लावले.


रविवारी स्पर्धेच्या उद्घाटनानंतर मुले व मुलींची महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा सांघिक स्पर्धा रंगली होती. तर सोमवारी (दि.8 जुलै) दुपारच्या सत्रात उपांत्य फेरीच्या स्पर्धा पार पडल्या. बॅडमिंटनच्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांसह पालकांनी मोठी गर्दी केली होती. उपांत्य फेरीत मुलींमध्ये पुणे, रायगड व मुलांमध्ये ठाणे, पालघर यांनी आगेकुच केली.


रविवारी झालेल्या सामन्यांचा निकाल पुढील प्रमाणे:-
17 वर्षा आतील मुली- हिंगोली विरुध्द अमरावती (अमरावती विजयी 0-2), पालघर विरुध्द वाशिम (पालघर विजयी), छत्रपती संभाजीनगर विरुध्द बुलढाणा (छत्रपती संभाजीनगर विजयी 2-0), कोल्हापूर विरुध्द सोलापूर (कोल्हापूर विजयी 2-0), अहमदनगर विरुध्द चंद्रपूर (अहमदनगर विजयी 2-0), मुंबई उपनगर विरुध्द रत्नागिरी (मुंबई उपनगर विजयी 2-0), धुळे विरुध्द सातारा (सातारा विजयी 0-2), परभणी विरुध्द नाशिक (नाशिक विजयी 0-2), सिंधूदूर्ग विरुध्द जळगाव (जळगाव विजयी 0-2), यवतमाळ विरुध्द सांगली (सांगली विजयी 0-2), गडचिरोली विरुध्द ठाणे (ठाणे विजयी), वर्धा विरुध्द अकोला (वर्धा विजयी 2-0), ठाणे विरुध्द रत्नागिरी (ठाणे विजयी 2-0), बुलढाणा विरुध्द कोल्हापूर (कोल्हापूर विजयी 0-2), सातारा विरुध्द जळगाव (सातारा विजयी 2-0), यवतमाळ विरुध्द वर्धा (वर्धा विजयी 0-2), सातारा विरुध्द नाशिक (नाशिक विजयी 0-2), जळगाव विरुध्द रायगड (रायगड विजयी 0-2), सांगली विरुध्द ठाणे (ठाणे विजयी 1-2), वर्धा विरुध्द मुंबई (मुंबई विजयी 0-2), ठाणे विरुध्द कोल्हापूर (ठाणे विजयी 2-0), सातारा विरुध्द वर्धा (सातारा विजयी 2-0), सांगली विरुध्द मुंबई (मुंबई विजयी 0-2), रायगड विरुध्द छत्रपती संभाजीनगर (रायगड विजयी 2-1), नागपूर विरुध्द छत्रपती संभाजीनगर (नागपूर विजयी 2-0), पुणे विरुध्द मुंबई उपनगर (पुणे विजयी 2-1), ठाणे विरुध्द मुंबई (ठाणे विजयी 2-0).


17 वर्षा आतील मुले- धाराशीव विरुध्द सांगली (सांगली विजयी 0-2), मुंबई विरुध्द सोलापूर (मुंबई विजयी 2-0), रायगड विरुध्द अमरावती (रायगड विजयी 2-0), मुंबई उपनगर विरुध्द छत्रपती संभाजीनगर (छत्रपती संभाजीनगर विजयी 1-2), परभणी विरुध्द वाशिम (परभणी विजयी 2-1), भंडारा विरुध्द नाशिक (नाशिक विजयी 0-2), हिंगोली विरुध्द अकोला (अकोला विजयी 0-2), सिंधूदुर्ग विरुध्द नागपूर (नागपूर विजयी 0-2), लातूर विरुध्द चंद्रपूर (लातूर विजयी 2-0), धुळे विरुध्द पालघर (पालघर विजयी 0-2), अहमदनगर विरुध्द नांदेड (नांदेड विजयी 2-0), गडचिरोली विरुध्द पुणे (पुणे विजयी 0-2) नागपूर विरुध्द अमरावती (नागपूर विजयी 2-0), पालघर विरुध्द छत्रपती संभाजीनगर (छत्रपती संभाजीनगर विजयी 0-2), पुणे विरुध्द कोल्हापूर (पुणे विजयी 2-0), अहमदनगर विरुध्द मुंबई उपनगर (मुंबई उपनगर विजयी 0-2), परभणी विरुध्द नाशिक (नाशिक विजयी 1-2), अकोला विरुध्द नागपूर (नागपूर विजयी 0-2), लातूर विरुध्द पालघर (पालघर विजयी 1-2), अहमदनगर विरुध्द पुणे (पुणे विजयी 0-2), मुंबई विरुध्द रायगड (मुंबई विजयी 2-0).



उपांत्य फेरीतील सुपर थ्री मॅचेसचा निकाल पुढीलप्रमाणे:-
17 वर्षा आतील मुलींचे संघ- नागपूर विरुध्द पुणे (पुणे विजयी 1-2), रायगड विरुध्द ठाणे (रायगड विजयी 2-0).
17 वर्षा आतील मुलांचे संघ- ठाणे विरुध्द मुंबई (ठाणे विजयी 2-0), नाशिक विरुध्द पालघर (पालघर विजयी 0-2)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *