• Thu. Jul 24th, 2025

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण

ByMirror

Jul 22, 2025

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त हरित अभिवादन


पर्यावरणाचे रक्षण हे आपले सामाजिक व नैतिक कर्तव्य -आ. संग्राम जगताप

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. महिलांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.


या कार्यक्रमासाठी आमदार संग्राम जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कालींदी केसकर, प्रिया जानवे, अर्चना बनकर, सुरेखा सांगळे, रवीना करंदीकर, ज्योती दांडगे, राखी आहेर, नीता फाटक, श्‍वेता झोंड, कावेरी घोरपडे, सुरेखा जंगम, सविता कोटा, शिवानी सकट, आरती सकट यांच्यासह अनेक महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.


आमदार संग्राम जगताप म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण हे आपले सामाजिक व नैतिक कर्तव्य आहे. आज महिलांच्या हस्ते वृक्षारोपण होणे ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे. स्त्रीशक्ती जेव्हा पर्यावरणासाठी पुढे येते, तेव्हा या कृतीतून सकारात्मक बदल घडणार आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त अशा समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन हे खरे त्यांच्या कार्याला अभिवादन असल्याचे त्यांनी सांगितले.


सुनिल सकट म्हणाले की, आपले सण, वाढदिवस, आणि आनंदाच्या क्षणांना सामाजिक उपक्रमांशी जोडले पाहिजे. आपण वृक्षारोपण करून केवळ हरित परिसर घडवत नाही, तर पुढील पिढ्यांसाठी एक निरामय पर्यावरणाची शिदोरी उपलब्ध करुन देत आहोत. महिलांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला, हीच खरी प्रेरणा असून, पर्यावरण रक्षणासाठी सातत्याने अशाच उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *