प्रयास ग्रुप व नम्रता दादी नानी ग्रुपचा उपक्रम
गरबा नृत्याचे महिलांनी गिरवले धडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथे प्रयास ग्रुप व नम्रता दादी नानी ग्रुपच्या वतीने महिलांना फ्लॉवर मेकिंग व पूजा थाळी डेकोरेशन प्रशिक्षण देण्यात आले. तर नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांनी गरबा नृत्याचे धडे गिरवले.
गुलमोहर रोड, येथील कमलाबाई नवले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दिपाली देऊतकर यांनी कागद, चमकी, प्लॅस्टिक आदी विविध वस्तूंपासून फुले बनविण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यावेळी दादी-नानी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड, प्रयास ग्रुपचे अध्यक्ष रजनी भंडारी, सचिव हिरा शहापुरे, छाया राजपूत, संस्थापिका अलकाताई मुंदडा, मेघना मुनोत, लता कांबळे, अर्चना बोरुडे, शकुंतला जाधव, शशिकला झरेकर, शोभा कानडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
योगेश शिंगवी यांनी उपस्थित महिलांना पारंपारिक गरबा नृत्याचे प्रशिक्षण दिले. महिलांनी देखील गरबा नृत्यावर ठेका धरला होता. प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी वर्षभर महिलांच्या आरोग्यासह कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. स्वागत जयाताई गायकवाड यांनी केले. महिलांसाठी यावेळी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक स्पर्धा रंगली होती. अनुक्रमे अनुराधा पलटणे, सीमा शेळके, भारती भंडारी, मीनाक्षी जाधव, आशा कांबळे आदींनी बक्षीसे मिळवली. वैशाली उत्तेकर यांच्या वतीने विजेत्या महिलांना बक्षीसे देण्यात आली.
