• Thu. Oct 16th, 2025

सारसनगरच्या विधाते विद्यालयात रंगला मैदानी स्पर्धेचा थरार

ByMirror

Dec 20, 2024

वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात

विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाकडे वळावे -देवराम ढगे

नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. शाळेत विविध मैदानी स्पर्धेचा थरार रंगला होता. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या खेळातील कौशल्याचे प्रदर्शन घडविले.
तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक देवराम ढगे यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करुन व आकाशात फुगे सोडून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, ज्ञानदेव पांडुळे, पोलीस कॉन्स्टेबल शिरीष तरटे, संस्थेचे सरचिटणीस प्रा. शिवाजीराव विधाते, अभेद्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर विधाते, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संतोष सुसे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस उपनिरीक्षक देवराम ढगे म्हणाले की, विद्यार्थी मोबाईलमध्ये गुंतल्याने मैदान ओस पडत आहे. खेळाने शारीरिक व मानसिक विकास होत असल्याने विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणाबरोबरच मैदानी खेळाकडे वळावे. क्रीडा स्पर्धेतून करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहेत. शासकीय नोकरीसाठी खेळाडूंना जागा राखीव आहेत. बाल वयातच खेळाची गोडी निर्माण झाल्यास त्याचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रकाश भागानगरे म्हणाले की, जीवनात खेळ आनंद निर्माण करतो. तर जीवनात विजय मिळवून संयमाने व पराभव झाल्यास खचून न जाता पुढे जाण्याचे गुण विकसीत करतात. प्रत्येक विद्यार्थ्यांने एकतरी मैदानी खेळ खेळण्याचे त्यांनी आवाहन केले. प्रा. शिवाजी विधाते यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात राधाकिसन क्षीरसागर यांनी खेळाचे महत्त्व विशद केले. पाहुण्यांचा परिचय योगेश दरवडे यांनी करुन दिला.


वार्षिक क्रीडा मेळाव्यात शालेय मुला-मुलींनी सहभाग नोंदवला होता. यावेळी कबड्डी, खो-खो, धावणे, उंच उडी, लांब उंडी आदी सांघिक व वैयक्तिक मैदानी स्पर्धा रंगल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मेहेत्रे यांनी केले. आभार सारिका गायकवाड यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *