नगर क्लबच्या मैदानावर दिवस-रात्र फुटबॉल सामन्यांचा थरार
मुला-मुलींनी मैदानी खेळाची आवड जोपासण्याची गरज – नमिता फिरोदिया
नगर (प्रतिनिधी)- फुटबॉल खेळाला चालना व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने शहरातील नगर क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अहिल्यानगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे उद्घाटन ललिता प्रकाश फिरोदिया यांच्या हस्ते झाले. दिवस-रात्र रंगणाऱ्या लीग कम नॉकआऊट फुटबॉल सामन्यांच्या थरारचे प्रारंभ झाले आहे. या स्पर्धेचे हे तीसरे पर्व आहे.
नमोह फुटबॉलच्या नमिता फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संघ मालक दर्शन भंडारी (जीसी फायटर्स), सागर कायगावकर (एसजीके गोल्ड स्टार), जोएब खान (गुलमोहर चॅलेंजर्स), अभिनंदन भन्साळी (अवित्री वेलोसिटी किंग्स), प्रणिल मुनोत (कॉन्प्लेक्स सुपर हीरो), चेतन गांधी (गांधी वॉरीअर्स), ऋतविक वाबळे (आरडीएक्स ज्युनियर), आशिष तोट्टू (एक्सलन्स अचिव्हर्स) आदींसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नमिता फिरोदिया म्हणाल्या की, मुला-मुलींनी मैदानी खेळाची आवड जोपासण्याची गरज आहे. लहान मुलांमधून उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी शहरात नमोह फुटबॉल क्लब कार्यरत आहे. विविध प्रशिक्षण शिबिर व स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंचा चालना देण्याचे कार्य सुरु आहे. स्पर्धेच्या माध्यमातून चांगले खेळाडू पुढे येत असून, त्यांना पुढे जाण्यासाठी पाठबळ दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने 15 वर्षा खालील शहरातील शंभर उत्कृष्ट खेळाडूंना स्पर्धेसाठी निवडण्यात आले. 8 संघ मालकांनी या खेळाडूंची आपल्या संघात निवड केली. या 8 संघात ही स्पर्धा सुरु असून, सकाळ व संध्याकाळच्या सत्रात फ्लड लाईटमध्ये फुटबॉल सामन्यांचे रंगातदार सामने होत आहे.
उद्घाटनाच्या प्रारंभी खेळाडूंनी मैदानातून उत्कृष्ट संचलन केले. याप्रसंगी संघाचे प्रशिक्षक ऋषी पाटोळे, मयूर टेमक, प्रसाद पाटोळे, प्रणय रागिनवार, सिध्दार्थ चौहान, सौरभ चौहान, रोहन कुकरेजा, अक्षय बोऱ्हाडे आदी उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिध्दार्थ वांद्रे व ऋतिक चौहान परिश्रम घेत आहे.
या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या किटचे प्रायोजकत्व केपीसी ज्वेलर्स यांनी स्विकारले आहे. तर स्पर्धेसाठी संघाचे प्रायोजकत्व गुलाबचंद कार्पेटवाला, एस.जी. कायगावकर, गुलमोहर स्पोर्टस क्लब, अवित्री बाईक्स, कॉन्प्लेक्स स्मार्ट थेटर, प्रॉस्पौरा, एजीडब्ल्यू ग्रुप, एक्सलन्स क्लासेस यांचे लाभले आहे. सह-प्रायोजक राम एजन्सी व फन की लॅण्ड हे आहे.