आठरे पाटील बालगृहाला किराणा साहित्याची मदत
सांताक्लॉजसह धमाल करुन विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लुटला आनंद
नगर (प्रतिनिधी)- सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनने एमआयडीसी मधील आठरे पाटील बालगृहातील वंचित, निराधार बालकांसह ख्रिसमस सण साजरा केला. मुलांच्या भेटीला सांताक्लॉज आणून धमाल करण्यात आली. विविध मनोरंजनात्मक खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमाने हा सोहळा रंगला होता. सेवाप्रीतच्या वतीने बालगृहातील विद्यार्थ्यांसाठी किराणा साहित्यासह अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
सांताक्लॉजने विद्यार्थ्यांना चॉकलेटची भेट देऊन मुलांसह केक कापला. विद्यार्थ्यांसह सेवाप्रीतच्या सदस्यांनी गाण्यावर ठेका धरला होता. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाने बालगृहातील विद्यार्थ्यांचा ख्रिसमस सणाचा आनंद द्विगुणीत झाला होता. याप्रसंगी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख गीता नय्यर, सोनाली ग्रोव्हर, रिया विजन, सविता धुप्पड, सोनिया कुंद्रा, मीनू बन्सल, पल्लवी शहा, आंचल कंत्रोड, अर्चना खंडेलवाल, अन्नू थापर, गीता माळवदे, कशीश जग्गी आदींसह ग्रुपच्या सदस्या व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, जीवनात यश प्राप्त करण्यासाठी कोणावरही विसंबून राहू नये. जीवनात आपले अस्तित्व निर्माण करावे. शिक्षण घेऊन मोठे व्हावे. तर स्वतः यशस्वी झाल्यावर इतरांना देखील मदतीचा हात देऊन, इतरांचे जीवन प्रकाशमय करण्याचे त्यांनी आवाहन केले.
गीता नय्यर म्हणाल्या की, समाजात सण उत्सव साजरे होत असताना, वंचित घटकातील विद्यार्थी या आनंदापासून वंचित राहू नये. या उद्देशाने प्रत्येक धर्माचे सण-उत्सव सेवाप्रीतच्या माध्यमातून वंचित विद्यार्थ्यांसह साजरे केले जातात. तर उपेक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून सातत्याने सहकार्य करुन प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बालगृहाचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे यांनी सेवाप्रीतच्या माध्यमातून महिलांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. बालगृहाच्या अधीक्षिका पुष्पांजली थोरात यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन या उपक्रमाबद्दल आभार मानले. या प्रकल्पासाठी मीनू बन्सल, निशा नारंग, शारदा मल्होत्रा, नितिका गुप्ता, रवीना आहुजा, निकिता पंजाबी, टीना इंगळे, संगीता मेघानी, दर्शना गुगळे, शितल वाघ, गिता मित्तल, मंजू ललवानी, सुमिता वाही, किरण खोसला, माधुरी सारडा, भावना नय्यर, दीप नय्यर, सपना नय्यर, राजेंद्र जग्गी, सलोनी आहुजा, मोना आहुजा, सत्या वधवा, तृप्ती सराफ, प्रेरणा वधवा, करीना नवलानी, मुक्ता पंजवानी, पुनम कुमार, स्मिता अग्रवाल, निशा अरोरा, सुचिता घई आदींनी सहकार्य केले.
