• Wed. Jul 2nd, 2025

रिजनल तायक्वांदो स्पर्धेत केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 च्या विद्यार्थ्यांनी पटकावले सुवर्ण

ByMirror

Jul 30, 2024

विराज पिसाळ, क्षितिज पिसाळ व स्वयंम सातपुते यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 मधील खेळाडूंनी पुणे येथे पार पडलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या रिजनल तायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करुन सुवर्ण पदकांची कमाई केली. या स्पर्धेत विराज गजेंद्र पिसाळ, क्षितिज गजेंद्र पिसाळ व स्वयंम प्रकाश सातपुते यांनी सुवर्णपदक पटकावले.

तर या खेळाडूंची ऑगस्ट मध्ये केंद्रीय विद्यालय संगठनच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विराज पिसाळ हा सलग सहा वेळा राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेला एकमेव खेळाडू ठरला आहे.


या खेळाडूंना प्राचार्या पूजा सिंग, क्रीडाशिक्षक परदेशी, आशू सर, चंद्रेश मिना तसेच विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिन्ही खेळाडू केडगाव येथील एकलव्य तायक्वांदो अकॅडमीत सराव करत आहे. अकॅडमीचे प्रशिक्षक गणेश वंजारी, अल्ताफ खान, योगेश बिचितकर, मंगेश आहेर, सचिन मरकड, सचिन कोतकर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे.


विराज व क्षितिज हे दोन्ही खेळाडू अहमदनगर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. गजेंद्र पिसाळ व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका स्मिता पिसाळ यांचे मुले तर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांचे नातू आहेत. या गुणवंत खेळाडूंना विधीज्ञ व रयत सेवकांनी शुभेच्छा दिल्या असून, त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *