गरीबांना फसविण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची नोंदणी महानिरीक्षकांकडे तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे म्हसणे (सुलतानपूर) येथील गट नंबर 323, 39 शेजारी इतर गटांमध्ये अनाधिकृत प्लॉटिंग खरेदी झालेले खरेदीखत व खरेदी-विक्री व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने नोंदणी महानिरीक्षक (पुणे) यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रकरणी येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास नोंदणी महानिरीक्षक पुणे यांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
पारनेर तालुक्यातील मौजे म्हसणे (सुलतानपूर) येथील गट नंबर 323, 39 गटातील अनाधिकृत प्लॉटिंग खरेदी विक्री व्यवसाय तत्काळ बंद करण्यात यावे. या गटात कुठलेही सामायिक खरेदी खत नसून, गरीबांना फसवण्यासाठी रहिवासी खरेदी करत आहे. या गटात एक गुंठा खरेदी खत होत नसून, कधीही रद्द न होणारे कुलमुखत्यार पत्राच्या बळावर खरेदी विक्री सुरू आहे.
सदर गुंठे विकताना सरकारी मूल्यांकन ऐवजी खरेदीखत, साठेखत व इतर कागदपत्रावर उल्लेख केलेली रक्कम ही मूळ किमतीच्या पाचपट अथवा अधिक रकमेची दाखवली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अशा पध्दतीने बोगस खरेदीखत दाखवून शासनाचा मुद्रांक शुल्क बुडवियात येत आहे. दस्तलेखात दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी सर्वजण मिळून फसवणूक करत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. मौजे म्हसणे (सुलतानपूर) येथील गट नंबर 323, 39 शेजारी इतर गटांमध्ये अनाधिकृत प्लॉटिंग खरेदी झालेले खरेदीखत व खरेदी-विक्री व्यवसाय तात्काळ बंद करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.