काम्या वर्मा, ओजस वैकर, आर्या निंबाळकर यांनी पटकाविले प्रथम क्रमांक
अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ अहमदनगर प्राईड, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व लिओ क्लबच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये काम्या वर्मा, ओजस वैकर, आर्या निंबाळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
नुकतेच झालेल्या या चित्रकला स्पर्धेत शहर व उपनगरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी कलर्स ऑफ प्राईड या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेचे हे सहावे वर्ष होते. ही स्पर्धा तीन गटात घेण्यात आली. पहिला गट एलकेजी ते पहिली दुसर गट दुसरी ते पाचवी तिसरा गट सहावी ते दहावी, त्यांना अनुक्रमे रेखाटलेल्या चित्रात रंग भरणे, नैसर्गिक देखावा किंवा सण-उत्सव, जागतिक शांतता किंवा सक्षम भारत हे विषय स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात आले होते.
5 ऑक्टोबर रोजी या चित्रकला स्पर्धेचे बक्षिस वितरण केले जाणार असून, लवकरच स्थळ व वेळ निश्चित करुन विजेत्यांना कळविण्यात येणार आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्यास सायकलचे बक्षिस देण्यात येणार असून, इतर विजेत्यांसाठी विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. तसेच विशेष गटात झालेल्या स्पर्धेत स्नेहालय, बालभवन, मुकबधीर व दिव्यांग विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष गटात सार्थक हरारे, सोहम औराडे व अशोक दरंदले यांनी प्रथम क्रमांक मिळवले आहे.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:-
एलकेजी ते इयत्ता पहिली (लहान गट) प्रथम- काम्या वर्मा (आर्मी पब्लिक स्कूल), द्वितीय- संस्कृती झोडगे (अशोकभाऊ फिरोदिया), तृतीय- स्वर्ण प्रवीण साळुंके (बाई इचरज बाई), उत्तेजनार्थ दक्ष अभय दायमा (एसआरईएफ), दिव्यांग (माउंट लिटेरा झी स्कूल).
इयत्ता दुसरी ते पाचवी (मोठा गट) प्रथम- ओजस वैकर (ऑक्झिलियम कॉन्व्हेंट), द्वितीय- चिन्मय (आयकॉन पब्लिक स्कूल), तृतीय- स्वर्ण रमेश बोल्ली (भाऊसाहेब फिरोदिया स्कूल), उत्तेजनार्थ- पूजा योगेश ताटी (विवेकानंद स्कूल), मालकर (सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट).
इयत्ता सहावी ते दहावी (वरिष्ठ गट)- प्रथम- आर्या सुनील निंबाळकर (एसएनबीपी), द्वितीय- सोम्या सचिन जाधव (कर्नल परब), तृतीय- अपूर्वा नांदूकर (सेंट विवेकानंद), उत्तेनार्थ- आरुष हेमंत विटणकर (आयकॉन पब्लिक स्कूल), कीर्ती मनोज पवार (अशोकभाऊ फिरोदिया).
विशेष श्रेणीत घेण्यात आलेली स्पर्धा लहान गट प्रथम- सार्थक नवनाथ हरारे (मूकबधिर विद्यालय), द्वितीय- प्रणवी पिसाळ (स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल), मोठा गट प्रथम- सोहम औराडे (स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल), द्वितीय- ईश्वरी दीपक बिडकर (किशोर बालभवन), वरिष्ठ गट प्रथम- अशोक दरंदले (मूकबधिर विद्यालय), द्वितीय- श्रृती विलास चकाले (बालभवन डॉ. अ. कलाम).