• Wed. Oct 15th, 2025

रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करावे

ByMirror

Jan 4, 2025

सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांना निवेदन

नगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी भाजप रेल्वे बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनिल सबलोक यांनी सेंट्रल रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. रेल्वेचे महाप्रबंधक मीना यांनी भारतातील सर्व रेल्वे स्टेशनला पत्र पाठवून नामांतरची प्रक्रिया सुरु झालेली असून, लवकरच नवीन नाव लावले जाणार असल्याचे आश्‍वासन दिले.


नगरच्या रेल्वे स्थानकावर आलेले रेल्वेचे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांना निवेदन देऊन झालेल्या नामांतराबाबत सबलोक यांनी लक्ष वेधले. राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे अहमदनगर हे नाव बदलून आता अहिल्यानगर झाले आहे. त्याला केंद्र सरकारने देखील मंजुरी दिलेली आहे. लवकरात लवकर अहमदनगर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून अहिल्यानगर करावे अशी मागणी नगरकरांच्या वतीने भाजप रेल्वे बोर्ड जिल्हाध्यक्ष सबलोक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *