• Sat. Feb 7th, 2026

सावित्रीज्योती महोत्सवातून तरुणाईच्या सुप्त कलागुणांना मिळाले व्यासपीठ

ByMirror

Feb 7, 2026

राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांना युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग


सावित्रीज्योती महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून समाज प्रबोधनाची चळवळ -हेलन पाटोळे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीज्योती महोत्सवाच्या निमित्ताने व राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्‍वभूमीवर अहिल्यानगर शहरात विविध कलात्मक, बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. निबंध, वकृत्व, चित्रकला, हस्तकला, नृत्य, पथनाट्य यांसह ब्युटी टॅलेंट शो अशा बहुविध स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमुळे तरुणाईला आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळाले.


अहिल्यानगर महानगरपालिका, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर बार असोसिएशन, समाजकार्य महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुलमोहर रोड, सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध वयोगटांतील महिला व युवकांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


या स्पर्धांचे बक्षीस वितरण सामाजिक कार्यकर्त्या हेलन पाटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अहिल्यानगर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कृष्णा झावरे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, उपाध्यक्ष ॲड. घुले, सचिव शेटे, खजिनदार ॲड. वसीम खान, महिला सहसचिव ॲड. सारिका झरेकर, कार्यकारिणी सदस्या ॲड. प्राजक्ता करांडे, ॲड. अनुराधा येवले, ॲड. अनिता दिघे, ॲड. महेश शिंदे, रजनी ताठे, वीर पत्नी फरजाना शेख, अंबिका भोंदे, पुष्पा चौधरी, मनीषा औटी, विद्या काळे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हेलन पाटोळे म्हणाल्या की, सावित्रीज्योती महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून समाज प्रबोधनाची चळवळ आहे. महिलांनी व तरुणांनी आपली क्षमता ओळखून शिक्षण, कला, क्रीडा व सामाजिक कार्यात पुढे येणे काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमधून आत्मविश्‍वास वाढतो, नेतृत्वगुण विकसित होतात आणि समाजाला सकारात्मक दिशा मिळते. तरुणाईने केवळ स्पर्धांपुरते मर्यादित न राहता समाजासाठी योगदान देण्याची भूमिका घेण्याचे त्यांनी सांगितले.


ॲड. महेश शिंदे म्हणाले की, “राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक भान निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आजच्या तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्या क्षमतेला योग्य व्यासपीठ दिल्यास युवक देशाच्या विकासात मोलाची भूमिका बजावू शकतात. सावित्रीज्योती महोत्सवासारखे कार्यक्रम महिलांच्या सक्षमीकरणासोबतच युवकांना सकारात्मक विचारांची दिशा देणारे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. पुष्पा जेजुरकर, ॲड. शकील पठाण, ॲड. मनीषा भिंगारदिवे, ॲड. गायत्री गुंड, ॲड. दिनेश शिंदे, ॲड. यश सावंत, ॲड. अक्षय ठोकळ, ॲड. तुषार शेंडगे, रजनीताई ताठे, जयश्री शिंदे, आरती शिंदे, कान्हू सुंबे, भाऊसाहेब पादीर, मनीषा शिंदे, तुषार रणनवरे, संभाजी गिरी, वैशाली कुलकर्णी, प्रियांका नगरकर, ॲड. प्रशांत साळुंके, डॉ. ईसाभाई शेख, प्रा. सुनील मतकर, जयेश शिंदे, सुहास सोनवणे, राजकुमार चिंतामणी, अनिल साळवे, सचिन साळवी, अश्‍विनी वाघ, हेमलता कांबळे, दिपाली उदमले, मीनाताई म्हसे, ॲड. विद्या शिंदे, दिलीप घुले आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड यांनी करुन उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *