हर दिन मॉर्निंग ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रक्षाबंधन साजरा
महिलांचा मान सन्मानार्थ व पर्यावरण रक्षणाची घेतली शपथ
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडत असताना, त्यांच्या सुरक्षेबरोबरच समाजाची मानसिक प्रवृत्ती बदलण्याची गरज आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचा आदर राखण्याचे संस्कार मुलांमध्ये घडविले पाहिजे. समाज व संस्कृतीचा पाया महिलांमुळे टिकला आहे. त्यांना संरक्षण देण्याची नव्हे तर मुक्त वातावरण निर्माण करुन देण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन हर दिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांनी केले.
पर्यावरण संवर्धनासह आरोग्य चळवळ चालविणाऱ्या हर दिन मॉर्निंग ग्रुप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भवानीनगर (भिंगार) यांच्या वतीने रक्षाबंधन सण साजरा करुन महिलांचा मान सन्मानार्थ व पर्यावरण रक्षणाची शपथ घेण्यात आली. यावेळी सपकाळ बोलत होते. यावेळी राजश्री राहिंज, निर्मलाताई पांढरे, कांताबाई स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्रीपाद मुंगी, शिवदास काळे, सुभाष रासणे, हरदिनचे मेजर दिलीप ठोकळ, संजय भिंगारदिवे, दीपक धाडगे, सुधीर कपाले, विठ्ठल राहिंज, दिनेश शहापूरकर, सर्वेश सपकाळ, राजू कांबळे, विश्वास (मुन्ना) वाघस्कर, अभिजीत सपकाळ, प्रकाश देवळालीकर, रमेश वराडे, कुमार धतुरे, अविनाश जाधव, विकास भिंगारदिवे, सरदारसिंग परदेशी, शेषराव पालवे, नामदेवराव जावळे, किरण फुलारी, विकास निमसे, योगेश चौधरी, राजू शेख, संतोष लुणिया, रमेश कोठारी, सुहास देवराईकर, सुनील कसबे, राम झिंजे, अतुल बोंदर्डे, दीपक बोंदर्डे, गोरख उबाळे, रामशंकरसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.
पुढे सपकाळ म्हणाले की, सामाजिक समतोल साधण्यासाठी पर्यावरण रक्षणाची जबाबदारी देखील सर्वांची आहे. पर्यावरणाचे प्रश्न गंभीर बनत असताना, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने घेण्याचे त्यांनी आवाहन केले. श्रीपाद मुंगी यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सर्व उपक्रमामध्ये महिलांना देखील मान-सन्मान दिला जात आहे.
आरोग्य व पर्यावरण चळवळीत महिलांचा देखील सहभाग राहणार असल्याचे स्पष्ट करुन सुरु असलेल्या हरदिनच्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. उपस्थित महिलांनी हरदिनच्या सर्व सदस्यांना राख्या बांधल्या.
