• Fri. Aug 1st, 2025

चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

ByMirror

Jan 10, 2025

नगर (प्रतिनिधी)- चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. नगर न्यायालयातील विशेष दिवाणी दावा 12 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या तडजोडीप्रमाणे ताहेर सिराजोद्दीन पटेल यांनी फारूक हबीब शेख आणि अल्ताफ ताजोद्दिन इनामदार यांना रक्कम 80 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. या रकमेपोटी धनादेश वटला नसताना चेक बाउन्सची केस टाळण्यासाठी पटेल यांनी चेकचा गैरवापर होवू नये, यासाठी दाखल केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.


12 डिसेंबर 2023 ताहीर पटेल यांनी फारूक हबीब शेख आणि अल्ताफ ताजोद्दिन इनामदार यांना समजूत करारनामा लिहून दिलेला होता. समजूती करारनाम्याप्रमाणे शेख आणि इनामदार यांना प्रतिवादी करिता रक्कम 20 लाख मिळाले होते. उर्वरित राहिलेली 60 लाख रक्कम हे ताहीर पटेल यांनी धनादेश प्रत्येकी 20 लाख चे न्यायालयात दाखल केलेल्या प्रोसेस प्रमाणे दिली होती. परंतु ताहेर पटेल यांनी शेख आणि इनामदार यांच्यासोबत परत 3 जुलै 2024 रोजी पुरवणी समजूत करारनामा करून 5 लाख रुपये दिले. उर्वरित राहिलेले 55 लाख 13 ऑगस्ट पर्यंत देण्याचे मान्य व कबूल केले होते. त्याबाबत धनादेश दिलेले होते. सदरचे धनादेश प्रतिवादी यांनी वटवण्यासाठी टाकला असतो, तो न वाटता परत आला व ठरल्याप्रमाणे रक्कम अदा झाली नव्हती.


म्हणून ताहेर सिराजोद्दीन पटेल यांनी सदर चेक न वाटल्यामुळे स्वतःवर चेक बाउन्स व फसवणुक सारखी केस होऊ नये, म्हणून नगर येथील 12 वे सहदिवानी न्यायाधीश यांच्या न्यायालयात विशेष दिवाणी दावा दाखल केला. सदर दाव्यामध्ये वादी म्हणजे ताहेर पटेल यांनी त्यांनी दिलेल्या चेकचा गैरवापर होऊ नये, म्हणून अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून प्रतिवादी शेख आणि इनामदार यांच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन निशाणी पाच वर केलेला मनाई हुकूमाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. शेख व इनामदार यांच्या वतीने ॲड. हाजी रफिक बेग, ॲड. रियाज बेग व ॲड. अयाज बेग यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *