• Tue. Jul 8th, 2025

ज्ञानसाधना गुरुकुलच्या बाल वारकऱ्यांच्या दिंडीची केडगाव देवीला प्रदक्षिणा

ByMirror

Jul 7, 2025

एक हजार बाल वारकऱ्यांचा दिंडीत सहभाग


वारकरी संप्रदायची परंपरा जोपसण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करते -प्रा. प्रसाद जमदाडे

नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त पायी दिंडी उत्साहात काढण्यात आली. या दिंडीत एक हजार बाल वारकऱ्यांनी सहभाग नोंदवला. बाल वारकऱ्यांचा केडगाव देवी येथे रिंगण सोहळा पार पडला. यावेळी चिमुकल्यांनी देवीला प्रदक्षिणा घातली.


या पायी दिंडीतील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुख्मिणी, संत तुकाराम महाराज, मीराबाई, मुक्ताबाई यांची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. तर सर्व विद्यार्थी वारकऱ्यांच्या पोशाखात दिंडीत सहभागी झाले होते. दिंडीने केडगाव म्हणजे प्रती पंढरपूरचा भास निर्माण झाला होता. केडगाव देवी मंदिरासमोर माजी नगरसेवक मनोज कोतकर व परिसरातील नागरिकांनी दिंडीचे स्वागत केले.


ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे म्हणले की, शिक्षणाबरोबरच आपल्या भारतीय संस्कृतीची माहिती विद्यार्थ्यांना झाली पाहिजे. येणारी पिढी आधुनिकतेच्या नावाखाली बिघडलेली दिसून येत आहे. या पिढीसाठी धार्मिक शिक्षण घराघरात पोहोचले पाहिजे यासाठी क्लासच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


माजी नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, वारकरी संप्रदायची असलेली परंपरा जोपासण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करत आहे. या बाल वारकऱ्यांकडे पाहून केडगाव हे प्रति पंढरपूर असल्याचे वाटू लागले. विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमांच्या माध्यमातून आपली संस्कृती जोपसण्याचे कार्य चांगल्या पध्दतीने होत असल्याचे स्पष्ट करुन या धार्मिक उपक्रमाबद्दल कौतुक केले.


मुख्याध्यापक संदीप भोर यांनी शिक्षणाबरोबर संस्कार देण्याचे काम ज्ञानसाधना गुरुकुल करत आहे. मुलांना शिक्षण देत असताना, संस्कार देणे सध्याच्या काळाची गरज बनली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमातून ज्ञानसाधना मुलांना सतत संस्कार देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पायी दिंडीसाठी जगदंबा तरुण मंडळ, शिवमुद्रा ग्रुप, साई सेवा महिला मंडळ, मनोज कोतकर मित्र मंडळ, केडगाव बास्केट बॉल क्लब, बच्चन कोतकर, अनिल ठुबे, अजित कोतकर, संचालक भैरू कोतकर, दत्तात्रय चेमटे, जगन्नाथ चेमटे, अमित ढोरसकर, छबुराव कोतकर, मेजर राजाराम कोतकर, अमोल कोतकर, गणेश पोंदे, संदीप काळे, राहुल पटवा, आदिनाथ घाटविसावे, मेजर रवींद्र टकले, तुषार कोतकर, ऋषिकेश कोतकर, अर्चना गारुडकर, इंदुबाई रायकर, ओम बनकर यांनी मुलांना फराळाचे वाटप करुन पाण्याची व्यवस्था केली होती. तसेच महेश कोतकर, शिवाजी बोरुडे, भाऊ कोतकर, अनिल ठुबे, रामदास ढवळे, भैरू कोतकर, शैलेश सुंबे, साई सेवा मंडळ व साई सेवा महिला मंडळ यांनी पूजा करून दिंडीचे स्वागत केले.


या कार्यक्रमासाठी लंडन किड्स प्री स्कूल च्या प्राचार्या रुचिता जमदाडे, नितीन ठुबे, गुलाब कोतकर, किरण खांदवे, स्वप्नील परांडे, रणजित ठुबे, विलास गारुडकर, सचिन भस्मे, निलेश चेमटे, शिक्षक शाहरुख शेख, शबाना शेख, प्रतिक्षा फुलारी, जोसना सातपुते, सुवर्णा दाणी, गीता रणखांब, प्रतिभा साबळे, जयश्री साठे, संचालक प्रा. प्रसाद जमदाडे, संजय कोतकर, गणेश कोतकर आदींसह सर्व सहकारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *