नगर (प्रतिनिधी)- सामाजिक व सौंदर्य शास्त्र अंतर्भूत असलेल्या आणि मानवी जीवनाचे मुळ सांगणाऱ्या गणराज प्रकाशन प्रकाशित लेखक पद्मनाभ हिंगे लिखित शाल्मली ललित ग्रंथ पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि.28 मार्च) होणार आहे.
शहरातील चितळे रोड येथील, जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात सकाळी 10 वाजता पुस्तक प्रकाशनाचा सोहळा रंगणार आहे. यावेळी कवीवर्य सिने अभिनेते बाबासाहेब सौदागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ संदिप सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी चंद्रकांत पालवे, मसापचे केंद्रीय सदस्य जयंत येलुलकर, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, साहित्यिक स्वाती अहिरे उपस्थित राहणार आहेत.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला शहरातील साहित्यिक, पुस्तक प्रेमी यांना उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक अनुपम हिंगे, गंधाली (अदिती) टांक, प्रकाशक प्रा. गणेश भगत यांनी केले आहे.