• Thu. Jan 22nd, 2026

काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा जिल्हा न्यायालयात निषेध

ByMirror

Apr 24, 2025

शहर बार असोसिएशनच्या वतीने बळी पडलेल्या निरपराध नागरिकांना श्रद्धांजली

धर्मांधतेने दहशत पसरविणाऱ्यांना मुळापासून उखडून टाका -ॲड. राजेश कातोरे

नगर (प्रतिनिधी)- काश्‍मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा शहर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात निषेध करण्यात आला. या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या 26 निरपराध नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. न्यायालय परिसरात झालेल्या शोकसभेला शहर बार असोसिएशनचे पदाधिकारी व वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शोकसभेत शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, लायर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ॲड. रावसाहेब बर्डे, व्हाईस चेअरमन ॲड. विनायक सांगळे, ॲड. अनिता दिघे, खजिनदार ॲड. अनुराधा येवले, ॲड. रघुनाथ शेळके, बी.एन. भालसिंग, ॲड. भगवान कुंभकर्ण, ॲड. अक्षय काळे, ॲड. अतिश निंबाळकर, ॲड. करूणा शिंदे, ॲड. बाळकृष्ण शेडाळे, ॲड. गौरी लोखंडे, ॲड. सुरेश कोहकडे, ॲड. बहिरू जरे, ॲड. आदित्य घालमे, ॲड. बी.जी. खेडकर, ॲड. आनंद सूर्यवंशी, ॲड. सुजाता बोडखे, ॲड. भागा गुंजाळ, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. रवींद्र रूपसिंग, ॲड. एस.ए. कोतकर, ॲड. रफिक बेग, ॲड. विनायक सांगळे, ॲड. सतीश चौधरी, ॲड. प्रज्ञा उजागरे, ॲड. अभिषेक म्हस्के, ॲड.हर्षद काकडे, ॲड. गौरव दांगट, ॲड. ए.आर. मोकाटे आदींसह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सर्वांनी मौन पाळून हल्ल्यात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली. शोकसभेत बोलताना ॲड. राजेश कातोरे म्हणाले की, धर्माच्या नावावर निष्पाप नागरिकांचे प्राण घेणे ही अधार्मिक वृत्ती असून अशा अमानुष कृत्यांचा तीव्र निषेध व्हायला हवा. या हल्ल्याच्या सूत्रधारांना शोधून जशास तसे उत्तर दिले गेले पाहिजे. धर्मांधतेच्या नावावर अशा घटना घडवणाऱ्यांना मुळापासून उखडून टाकणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.


ॲड. सुरेश लगड म्हणाले की, पाकिस्तानसारखे शत्रूराष्ट्र दहशतवादी संघटनांना पाठीशी घालून भारताच्या अखंडतेला सुरुंग लावत आहे. हा भ्याड हल्ला म्हणजे मानवतेवर झालेला घात आहे. ॲड. अनिता दिघे म्हणाल्या की, फक्त श्रद्धांजली वाहून उपयोग नाही, आता वेळ आली आहे थेट उत्तर देण्याची. भारताचे नागरिक अशा भ्याड हल्ल्यांना घाबरत नाहीत. धर्म विचारून मारणाऱ्यांना आता तितक्याच कठोरतेने उत्तर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


गुरुवारी (दि.24 एप्रिल) महाराष्ट्रातील सर्वच न्यायालयात काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवून, बळी गेलेल्या नागरिकांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे. यावेळी सर्व वकिलांनी एकमताने केंद्र सरकारकडे दहशतवादी संघटनांविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. देशाच्या अखंडतेवर आणि शांततेवर घाला घालणाऱ्या शक्तींना माफ करता कामा नये, असा सूर यावेळी उमटला.


काश्‍मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा शहर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात निषेध करण्यात आला. या भ्याड हल्ल्यात बळी पडलेल्या 26 निरपराध नागरिकांना श्रद्धांजली वाहताना शहर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, लायर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे ॲड. रावसाहेब बर्डे, व्हाईस चेअरमन ॲड. विनायक सांगळे, ॲड. अनिता दिघे, खजिनदार ॲड. अनुराधा येवले, ॲड. रघुनाथ शेळके, बी.एन. भालसिंग, ॲड. भगवान कुंभकर्ण, ॲड. अक्षय काळे, ॲड. अतिश निंबाळकर, ॲड. करूणा शिंदे, ॲड. बाळकृष्ण शेडाळे, ॲड. गौरी लोखंडे, ॲड. सुरेश कोहकडे, ॲड. बहिरू जरे, ॲड. आदित्य घालमे, ॲड. बी.जी. खेडकर आदी. (छाया-वाजिद शेख-नगर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *