सहविचार सभेत विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा -बाबासाहेब बोडखे
विविध प्रश्न सोडविण्याचे आश्वासन
नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या सोबत सहविचार सभा पुणे येथे पार पडली. यामध्ये शालार्थ आयडी, अतिरिक्त शिक्षक समायोजन, थकीत वेतन, अनुकंपा व शिक्षकेतर भरती, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, रात्रशाळा शिक्षक व शाळांचा अडचणी संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आल्याची माहिती शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
तसेच या बैठकीत 15 मार्च 2024 संच निर्धारणामुळे 0 शिक्षकांच्या मुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान पटसंख्या अट शिथिल करण्याबाबत,100 पेक्षा पटसंख्या कमी झाल्यामुळे मुख्याध्यापक पद अधिक्रमित करणे, त्यामुळे शालेय व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणी त्यामुळे शाळा तेथे मुख्याध्यापक व कायम मान्यता दिली जावी, खाजगी मान्यताप्राप्त शाळा मुख्याध्यापक अर्जित रजेचे रोखीकरण व प्रसुती रजेवर गेलेल्या महिला शिक्षिकेच्या जागेवर बदली शिक्षक प्राथमिक शाळेत मिळवा, पवित्र पोर्टल रायगड पालघर चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील रोस्टर तपासणी मुळे निर्माण झालेल्या अडचणी संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला.
भरती निरंतर प्रक्रिया असल्याने मुदतीचे बंधनं पवित्र पोर्टलला असु नये, अतिरिक्त शिक्षक समायोजनामध्ये शाळा व संस्था रिक्त जागा कळवत नसल्याने गैरमार्गाने समायोजन होते समायोजनात पारदर्शकता असावी माध्यमिक कडून प्राथमिक कडे समायोजन झाले असेल तर टिईटीचा आग्रह होतो, त्यातून सुट मिळावी, अशैक्षणिक कामे व शालेय पोषण आहार, 1 तारखेला वेतन, वरिष्ठ व निवड श्रेणी देत असताना लेखाधिकारी व शिक्षण अधिकारी यांच्या कडून एमईपीएस ॲक्ट चे सर्रास पणे होणारे उल्लंघन भ्रष्टाचार, या व इतर शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षण संचालकांसह सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रश्नांपैकी जवळ जवळ 75% प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात आले असून, संबंधित विभागांना लवकरच सूचना करण्याचे आश्वासन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले. यावेळी शिक्षक परिषदेचे प्रातांध्यक्ष वेणुनाथ कडू, सहकार्यवाह राजकुमार बोनकीले, महिला आघाडी प्रमुख पुजा ताई चौधरी, माजी आमदार नागो गाणार, भगवानराव साळुंखे सर्व राज्य पदाधिकारी विभाग अध्यक्ष, कार्यवाह, राज्य पदाधिकारी व आयुक्त, शिक्षण संचालक, प्राथमिक माध्यमिक सहसंचालक सभेसाठी उपस्थित होते.