शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील कार्याचे केले कौतुक
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना क्रीडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी त्यांचा सत्कार केला. भाई सथ्था नाईट हायस्कूलला भेट देण्यासाठी आलेल्या आमदार दराडे यांनी डोंगरे यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी भाई सथ्था नाईट हायस्कूलचे चेअरमन डॉ. पारस कोठारी, प्राचार्य सुनील सुसरे, वैभव सांगळे, विक्रांत लोंढे, सचिन फिस्के, रवींद्र गावडे आदी उपस्थित होते.
निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांचे सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य सुरु आहे. ग्रामीण भागात डोंगरे यांनी क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम केले आहे.
विविध स्पर्धा घेऊन नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे ते सातत्याने कार्य करत आहे. कुस्ती खेळातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक खेळाडू घडले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने क्रीडा भूषण पुरस्कार देण्यात आला आहे.
