राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
शहरात वाढलेल्या गुन्हेगारीने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण -इंजि. केतन क्षीरसागर
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरात वाढती गुन्हेगारी व लूटमार रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दिपक वाघ, किरण घुले, रोहित सरना, ऋषीकेश जगताप, राजू मकासरे, मंगेश शिंदे, गौरव हारबा, कुनाल ससाणे, ओमकार मिसाळ, कृष्णा शेळके, केतन ढवण, अरबाज शेख, शिवम कराळे, आशुतोष पानमळकर, स्वप्निल कांबळे आदी उपस्थित होते.
शहरात दररोज नवनवीन गुन्ह्याच्या घटना घडत असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून, महिलांमध्ये देखील घबराटीचे वातावरण आहे. दररोज चॅन स्नॅचिंग, घरफोटी, लूटमार, टोळीयुध्द, मारहाण, दमदाटी आणि महिलांना छेडछाड असे अनेक गुन्हे घडत आहे. विविध घटनेत काहींचा खून देखील करण्यात आलेला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी रात्री पोलीसांची गस्त वाढवावी, बंद असलेल्या पोलीस चौकी पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यात याव्या, तपोवन रोडवर नव्याने पोलीस चौकी उभारावी, गुलमोहर रोडवरील चौकी पुन्हा कार्यानित करावी, गुन्हेगारांना कठोर शासन होण्यासाठी पोलीसांनी खमकी भूमिका घेण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तर यासंदर्भात तातडीने कार्यवाही करुन नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरात गुन्हेगारी वाढली असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अनेक छोट्या-मोठ्या प्रकरणात एखाद्याला जीवे मारले जात आहे. पोलिसांनी तात्काळ गुन्हेगारी रोखण्यासाठी उपाययोजना करुन नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या कार्यान्वीत केल्यास गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार आहे. -इंजि. केतन क्षीरसागर (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस)