महिला शिक्षिकेचा विनयभंग करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापकाचे निलंबन प्रकरण
आनखी एका शिक्षिकेची महिला अयोगकडे त्या मुख्याध्यापका विरोधात तक्रार
अहमदनगर (प्रतिनिधी)- एका महिला शिक्षिकेशी अश्लील वर्तन करुन तिचा विनयभंग करणाऱ्या खांडगाव (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र पूर्ण चौकशीनंतर कारवाईचा बडगा उगारला असताना चोराच्या उलट्या बोंबा सुरु झाल्या असून, त्या मुख्याध्यापकाने सुडबुध्दीने खोटा गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आल्याची दवंडी पिटण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आनखी एका शिक्षिकेने महिला अयोगकडे त्या मुख्याध्यापकाची तक्रार दाखल केली असून, याची चौकशी प्रलंबीत आहे.
खांडगाव (ता. पाथर्डी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपमुख्याध्यापक विजय तुळजाराम अकोलकर यांच्यावर महिला शिक्षिकेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन अकोलकर यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे. महिला आयोगाकडे तक्रार आल्याने मुंबई येथे या प्रकरणाची सुनावणी होवून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना हे प्रकरण गंभीर असल्याबाबत जवळपास वर्षभरापूर्वी कळविले होते. त्यानुसार गेल्या अनेक महिन्यांच्या पोलीसांच्या प्राथमिक तपासनानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र तो मुख्याध्यापक खोट्या बतावणी करुन सर्वांची दिशाभूल करत असल्याचा आरोप पिडीत शिक्षिकेने केला आहे.
त्या मुख्याध्यापकाने बदलीसाठी चुकीची कागतपत्रे सादर करून गंभीर आजारी कोट्यातून बदलीची सवलत घेणे, महिला शिक्षिकांना मानसिक त्रास देणे, पदाचा गैरवापर करणे, उपसरपंच निवडणुकीत सहभाग घेणे व वृत्तपत्रात्त राजकीय बातम्या प्रसारित करणे या बाबीसाठी संबधित मुख्याध्यपक प्राथमिक शाळा खांडगाव यांच्यावर जिल्हा परिषदेने दोषारोप भरलेले असून त्याची विभागीय चौकशी सुरु आहे.
हे प्रकरण सुरु असताना आनखी एका महिला शिक्षिकेने महिला अयोग आणि विशाखा समिती यांच्याकडे संबंधित मुख्याध्यपकाने त्रास दिल्याची तक्रार दाखल केली आहे. याची चौकशी प्रलंबित असून, संबंधित मुख्याध्यपकाने शून्य पटसंख्या असताना शालेय पोषण आहार आणि गणवेशसाठी खर्च केला आहे. त्याची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात अली आहे.
एका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाकडून गंभीर स्वरूपाच्या तक्ररी आल्याने प्राथमिक शिक्षण अधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी त्या प्रभारी मुख्याध्यापकाचे निलंबन केलेले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय झरेकर यांनी सांगितले असून, या कारवाईबद्दल जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षण विभागाच्या कारवाईचे स्वागत केले आहे.
