• Wed. Oct 15th, 2025

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत अहिल्यानगरच्या खेळाडूंचे यश

ByMirror

Nov 22, 2024

थानोजसाईरेड्डी किसरा याने सुवर्णपदक तर विराज पिसाळ याने पटकाविले कास्यपदक

एकलव्य तायक्वांदो अकॅडमी व तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सत्कार

नगर (प्रतिनिधी)- शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत एकलव्य तायक्वांदो अकॅडमी मधील अहिल्यानगरच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करुन विविध पदकांची कमाई केली. या स्पर्धेत थानोजसाईरेड्डी किसरा याने सुवर्णपदक तर विराज पिसाळ याने कास्यपदक पटकाविले. अदिती धावड हिने देखील उत्कृष्ट प्रदर्शन केले.


नुकतेच राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा विदिशा मध्य प्रदेश येथे पार पडली. या खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक गणेश वंजारे यांच्यासह ग्रँड मास्टर अल्ताफ खान, योगेश बिचीतकर, सचिन मरकड, मंगेश आहेर यांचे मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा एकलव्य तायक्वांदो अकॅडमी व तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे सचिव घनश्‍याम सानप, अमोल काजळे, तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. माणिक विधाते, एकलव्य तायक्वांदो अकॅडम चे अध्यक्ष दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफ्फार पठाण, खजिनदार प्रसाद कुलकर्णी, सोनाली काळे यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *