अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी.
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयातील स्वच्छतागृहाचे काम चालू आहे जर काम चालू असताना बिल अदा केले आहे याचा अर्थ असा की कनिष्ठ अभियंता ढेरे यांनी जिल्हा परिषदेच्या स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवून देखील संपूर्ण ३३ लाख ५४ हजाराचे बिल काढून दिले यामध्ये शासनाला खोटी माहिती दिली व शासनाची फसवणूक केली असून या कनिष्ठ अभियंता यांच्या मनमानी भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी मानव विकास परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मानव विकास परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांनी निवेदन दिले.
पुढे निवेदनात म्हटले आहे की, अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील स्वच्छतागृहाची दुरुस्तीचे बिले एक महिना आधीच काम पूर्ण नसताना देण्यात आली बिलासाठी लागणाऱ्या नियम व अटीचे उल्लंघन करून कनिष्ठ अभियंता यांनी आर्थिक हितास जोपासण्याकरिता नियम धाब्यावर बसून हा भ्रष्ट मनमानी कारभार केला आहे जर हे काम पूर्ण झाले आहे तर मग आत्ता चालू का आहे जर काम चालू आहे तर मग बिल आधीच का देण्यात आले असे अनेक प्रश्न निर्माण होत असून स्वच्छतागृहाचे काम पूर्ण नसताना बिल देण्याकरिता वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा कनिष्ठ अभियंता हे मोठे आहेत का? कनिष्ठ अभियंता ढेरे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार केलेला दिसून येत आहे अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांची जंगम मालमत्ता व खातेनिहाय चौकशी करून निलंबित करण्यात यावे व दिलेल्या तक्रारी अर्जाची दखल न घेतल्यास १६ जून २०२५ रोजी जिल्हा परिषद कार्यालय समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.