विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- युनिव्हर्सल अबॅकस ॲण्ड वैदिक मॅथ्स असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.3 ऑगस्ट) रोजी राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एमआयडीसी येथील स्नेहालयात होणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन असोसिएशनचे अध्यक्षा हेमलता काळाणे व व्यवस्थापन समितीचे उज्वला मुरकुटे यांनी केले आहे.
रविवारी सकाळी या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. तर दुपारच्या सत्रात आमदार संग्राम जगताप व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी माजी नगरसेविका दिपालीताई बारस्कर, मीरा बारस्कर, मेकअप आर्टिस्ट शितल धापटकर, डॉ. शजाउद्दीन सय्यद, प्राचार्या स्टीफन डिसोजा, स्नेहालयाचे अनिल गावडे, हनिफ शेख, प्राचार्या सविता वाव्हळ, नितीन उदमले, मनीषा जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ही स्पर्धा ज्युनिअर, मास्टर ज्युनिअर, लेवल 1 ते 5 व वैदिक मॅथ्स या गटात होणार आहे. ही स्पर्धा सकाळच्या सत्रात पार पडणार असून, सर्व गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक ट्रॉफीसह बक्षीस दिले जाणार आहे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येणार असल्याचे म्हंटले आहे.