• Tue. Mar 10th, 2026

नेहरु युवा केंद्राचा क्रीडा सप्ताह

ByMirror

Jan 9, 2025

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

निरोगी आरोग्यासाठी मैदानाकडे वळा -ॲड. महेश शिंदे

नगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्यासाठी मैदानाकडे वळा! हा संदेश देण्याची गरज निर्माण झालेली आहे. शरीर संपदा हीच खरी संपत्ती असून, दररोज मैदानी खेळ खेळले पाहिजे. शालेय पातळीवर विविध स्पर्धा, वेगवेगळ्या क्रीडा संघटनेच्या स्पर्धेमध्ये आजच्या युवकांनी सहभागी झाले पाहिजे. आजचा युवा वर्ग ही आपल्या देशाची खरी ताकद असल्याचे प्रतिपादन ॲड. महेश शिंदे यांनी केले.


नेहरु युवा केंद्राच्या वतीने माय भारत अंतर्गत क्रीडा सप्ताह निमित्त आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी ॲड. शिंदे बोलत होते. श्रीकांत पेमराज गुगळे हायस्कूल व वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे मॅरेथॉन, कबड्डी, गोळाफेक, खो-खो स्पर्धा उत्साहात पार पडले. यावेळी प्राचार्य दत्तात्रय कसबे, शिक्षिका उज्वला सूर्यवंशी, आशा वरखडे, क्रीडाशिक्षक प्रशांत सुरसे, किशोर सप्रे, सुभाष पवार, राष्ट्रीय सेवा कर्मी दिनेश शिंदे, जयेश शिंदे आदी उपस्थित होते.


प्राचार्य दत्तात्रय कसबे यांनी आजचा युवक हा मोबाईलच्या विळख्यात गुरफटलेला आहे. त्यांना या मोहजाळातून बाहेर काढण्यासाठी क्रीडा स्पर्धा आवश्‍यक आहे. दररोज मैदानी खेळ खेळले पाहिजे. यासाठी पालकांनी मुलांच्या क्रीडा स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. नेहरु युवा केंद्राचे उपक्रम युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेतील विजेत्या संघ व खेळाडूंना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. क्रीडा स्पर्धेसाठी नेहरु युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अधिकारी संकल्प शुक्ला, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे ज्ञानेश्‍वर खुरांगे, विशाल गर्जे, प्रवीण कोंढावळे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *