महात्मा ज्योतिबा फुले जयंतीचा उपक्रम
समाजाला सामुदायिक विवाह चळवळीची गरज -किशोर डागवाले
नगर (प्रतिनिधी)- क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. 13 एप्रिल) माळी समाजबांधवांसाठी आयोजित वधू-वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जनवार्ता परिवार, जय युवा अकॅडमी, समृद्धी महिला बहुउद्देशीय संस्था, रयत प्रतिष्ठान, आणि क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या माळी समाजबांधवांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यामध्ये 150 पेक्षा जास्त मुलींची नाव नोंदणीचा उच्चांक झाला.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी मनपा स्थायी समितीचे माजी सभापती किशोर डागवाले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, जालना येथील माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, जालिंदर बोरुडे, दत्ता जाधव, सुवर्णाताई जाधव, शरद झोडगे, महेश झोडगे, फुले ब्रिगेडचे दीपक खेडकर, सारंग पंधाडे, मंगलताई भुजबळ, अंबादास गारुडकर, उद्योजक संतोष म्हस्के, ॲड. धनंजय जाधव, पोपट बनकर, ॲड. महेश शिंदे, गणेश बनकर, सुहासराव सोनवणे, विजय भालसिंग, रामदास फुले आदींचा समावेश होता.
किशोर डागवाले यांनी वधू-वर मेळाव्याचे सामाजिक महत्त्व अधोरेखित करत सामुदायिक विवाह चळवळीची गरज व्यक्त केली. लग्नासाठी आई-वडिलांना कर्जबाजारी होण्याची वेळ येते, ही समाजासाठी शोकांतिका आहे. सामुदायिक विवाहसोहळा हीच या प्रश्नावरची योग्य दिशा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दत्ता जाधव यांनी स्थळ जमविण्याचे कार्य महत्त्वाचे असून, हे कार्य संस्थांच्या माध्यमातून प्रभावीपणे पार पडत असल्याचे सांगितले. बाळासाहेब बोराटे यांनी ही चळवळ समाजहितासाठी सुरू असून, ती नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला. भास्करराव आंबेकर यांनी नव्या पिढीच्या अपेक्षा आणि व्यस्त जीवनशैलीमुळे विवाह जमविणे कठीण होत असल्याचे सांगून, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतलेले हे उपक्रम समाजासाठी उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
या मेळाव्यात विविध सामाजिक कार्याबद्दल अमोल मैड, विजय भालसिंग, प्रमिला गावडे, अशोक भालके, प्रा. सुनील मतकर, विनायक नेवसे, विद्या तन्वर, महावीर पोखरणा, सुहासराव सोनवणे, संध्या शेंडे, निवृत्ती बोराटे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रास्ताविक करताना सिताराम जाधव यांनी सांगितले की, जनवार्ता परिवाराने आतापर्यंत सहा वधू-वर मेळावे घेऊन 35 विवाह जमविले आहे. समाजातील विवाह प्रक्रियेला सामाजिक जबाबदारी म्हणून हातभार लावण्याचा आमचा उद्देश आहे, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात मंगलताई भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रभावी प्रबोधनात्मक व्याख्यान दिले. दुपारनंतरच्या सत्रात वधू-वरांनी व्यासपीठावर येऊन स्वत:चा परिचय दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. महेश शिंदे व अनंत द्रविड यांनी केले. आभार पोपट बनकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिताराम जाधव, ओंकार बनकर, नितीन डागवाले, डॉ. अमोल बागुल, कल्याणी गाडळकर, दिनेश शिंदे, जयेश शिंदे, जयश्री शिंदे, प्रा. अश्विनी विधाते, स्वाती बनकर, संदीप वाकडे, संतोष लयचेट्टी, प्रा. संजय पडोळे, ओंकार भोंदे, शेखर होले, गणेश आंबेकर, राजकुमार चिंतामणी, रामेश्वर राऊत, मिया सय्यद, श्रीनिवास नागुल यांनी परिश्रम घेतले.