• Wed. Jan 28th, 2026

पाककलेसह विविध स्पर्धेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

ByMirror

Mar 7, 2024

महिला दिनानिमित्त प्रगती फाउंडेशनचा उपक्रम; कडधान्यांपासून महिलांनी बनवले विविध खाद्य पदार्थ

महिलांनी स्वत:मधील कला, गुण व कौशल्यांना वाव देण्याचे काम करावे -अश्‍विनी वाघ

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला दिनानिमित्त प्रगती फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा महिलांनी आनंद लुटला. यावेळी रंगलेल्या मनोरंजनात्मक क्रीडा व बौध्दिक स्पर्धेत सहभागी होवून महिलांनी धमाल केली.


सावेडी, महावीर नगर येथील बटरफ्लाय नर्सरीत हा कार्यक्रम रंगला होता. या विविध स्पर्धेचे उद्घाटन संचलन अलका शेटे, ज्योती आरगडे, प्रगती फाउंडेशनच्या अध्यक्षा अश्‍विनी वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. यावेळी पाककला, एक मिनिट गेम शो, लिंबू चमचा असे वेगवेगळे खेळ महिलांसाठी घेण्यात आले. पाककला स्पर्धेतून महिलांना सकस आहाराचे महत्त्व सांगण्यात आले. यावेळी महिलांनी कडधान्यांपासून विविध खाद्य पदार्थ बनवले होते.


अश्‍विनी वाघ म्हणाल्या की, धावपळीच्या जीवनात महिलांना स्वतःसाठी वेळ देवून जीवनाचा आनंद घ्यावा. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना स्वत:मधील कला, गुण व कौशल्यांना वाव देण्याचे काम करावे. एखादा छंद जोपासल्यास ताण-तणाव कमी होत असतो. प्रगती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवून त्यांना प्रोत्साहन दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.


पाककला स्पर्धेचे परीक्षण कल्पना घडेकर व पुष्पा शिरपूर्या यांनी केले. यामध्ये महिलांनी कडधान्यापासून चकली, मूग मटकी, इडली, पुरी सब्जी, धपाटे, चटणी, आप्पे, स्प्रिंग रोल, हिरव्या मुगाची बर्फी, कटलेट, कडधान्याचे वाफवलेले थालीपीठ आदी स्वादिष्ट खाद्य पदार्थ बनवले होते. या स्पर्धेत चंदा कुमारी, लता आंधळे, रश्‍मी पुरी, आरती लयशेट्टी, सुप्रिया तवले, शुभांगी नन्नवरे, पूजा सोनवणे, शितल पल्ले, दिपाली गायकवाड, अमृता जगताप, निशा गोर्डे, शितल दळवी, हजारे, सुडके यांनी सहभाग नोंदवला. तर इतर स्पर्धेतही महिलांनी सहभागी होवून बक्षिस पटकाविले.आभार उज्वला ढुमणे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *