• Thu. Jan 22nd, 2026

जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अधिवेशनात जिल्ह्यातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

ByMirror

Dec 3, 2024

राजमाता जिजाऊंच्या विचाराने महिलांनी आजची आव्हाने पेलावी -अनिता काळे

नगर (प्रतिनिधी)- मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडचे राज्य अधिवेशन सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये नगर जिल्ह्यातून मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहभागी झाल्या होत्या.
अधिवेशनाच्या प्रारंभी सांगली शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही रॅली रंगली होती. यामध्ये लेझीम पथक, पारंपारिक वेशभुषेत सहभागी झालेल्या महिला व रिंगण सोहळा आकर्षण ठरले. महिलांनी फुगड्यांचा फेर धरला होता. या सोहळ्यात प्रत्येक जिल्ह्यातून जिजाऊ ब्रिगेड व मराठा सेवा संघाच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जय जिजाऊ… जय शिवराय! च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून निघाला.


या अधिवेशनात महिलांना मार्गदर्शन करताना अनिता काळे म्हणाल्या की, राजमाता जिजाऊंचे विचार घेऊन महिलांनी उत्तुंग भरारी घ्यावी. महिलांनी जिजाऊंचा आदर्श समोर ठेऊन मुलांना घडवावे व समाजाचा विकास साधावा. महिलांनी त्यांचा संघर्ष अभ्यासावा. त्यांच्या विचाराने स्त्रीयांनी आजची आव्हाने पेलण्याचे आवाहन केले. या अधिवेशनात विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *