अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रात सुरु असलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नगर तालुका क्रीडा समितीचे उपाध्यक्ष पै. नाना डोंगरे यांचा आगडगाव (ता. नगर) येथे विशेष सत्कार करण्यात आला.
जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, नगर तालुका क्रीडा समिती व ग्रामसुधार सेवा मंडळाचे श्री भैरवनाथ विद्यालय आगडगाव येथे शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. यावेळी मुख्याध्यापक त्रिंबक साळुंके यांनी डोंगरे यांचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उध्दव दुसुंगे, सचिव दिनकर थोरात, उपसरपंच संजय कराळे, भगवान मते, संचालक भिमा भिंगारदिवे, पोपट कराळे, सचिन मकासरे, प्रा. रंगनाथ सुंबे, संचालक संजय कराळे, माजी मुख्याध्यापक गोरक्ष कराळे, धोंडीभाऊ पैलवान आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
त्रिंबक साळुंके म्हणाले की, कुस्ती खेळासह इतर मैदानी खेळाला चालना देण्याचे कार्य पै. नाना डोंगरे करत आहे. विविध स्पर्धेतून ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देवून विविध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते. खेळाच्या प्रचार, प्रसारासाठी त्यांचे निस्वार्थपणे योगदान सुरु असून, ग्रामीण भागातून खेळाडू घडत असल्याचे त्यांनी सांगितले.