महाराष्ट्र राज्य व अहिल्यानगर गणित अध्यापक मंडळाच्या वतीने सन्मान
नगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत रेसिडेन्सिल हायस्कूलचा विद्यार्थी सोहम संतोष कानडे याने सिल्व्हर कॅटेगरी मेडल प्राप्त केले. महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ व अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळ वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षा नुकतीच पार पडली.
या परीक्षेचे बक्षीस वितरण अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या सभागृहात पार पडले. जनार्दन मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मच्छिंद्र वीर, गणित अध्यापक महामंडळाचे राज्य अध्यक्ष संजय निक्रड यांच्या हस्ते सोहम कानडे याचा सिल्व्हर कॅटेगरी मेडल, प्रशस्तीपत्र, रोख बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी अभयकुमार वाव्हळ, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित, प्राचार्य उल्हास दुगड, जिल्हा गणित मंडळाचे अध्यक्ष नवनाथ घुले, माध्यमिक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, कल्याण ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष कानडे, सुरेखा कानडे, अर्चना चव्हाणके, अश्विनी कदम, वैशाली शेळके शिक्षक, पालक विद्यार्थी उपस्थित होते.
सोहमने मिळवलेल्या यशाबद्दल सेवा सोसायटीचे संचालक शिवाजी भोसले, कलाशिक्षक प्रसाद कानडे, मार्गदर्शक शिक्षक प्रकाश पाटील, योगेश मोरे, प्रमोद अमृते, प्राचार्य विजय पोकळे, अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सचिव ॲड. विश्वासराव आठरे, सहसचिव जयंत वाघ, खजिनदार दिपलक्ष्मी म्हसे आदींनी अभिनंदन केले.