निस्वार्थपणे सामाजिक कार्याबद्दल सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- निस्वार्थपणे सामाजिक कार्य करणारे समाजसेवक अविनाश देडगावकर यांचा सावेडी येथील स्वामी समर्थ मंदिर केंद्रात सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेचे उपाध्यक्ष बाबुराव दळवी यांनी देडगावकर यांचा सत्कार केला. यावेळी योगेश साळुंखे, मनीषा साळुंखे, प्रभाकर मुळे, अक्षय हळगावकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
समाजसेवक अविनाश देडगावकर शहरात मागील 45 वर्षापासून निस्वार्थपणे सामाजिक कार्यात योगदान देत आहे. ऊन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता वाहतुक पोलीस प्रशासनास ट्रॅफिक सुरळीत करण्यास मदत करतात. धार्मिक व सामाजिक क्षेत्रात त्यांचे सक्रीय योगदान सातत्याने सुरु आहे. तर गोरगरीब लोकांची ते सेवा करत असतात.
नुकतेच त्यांनी नगर-पुणे महामार्गावरील एका हॉटेल समोर रोडच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या अनोळखी इसमाचे त्यांनी प्राण वाचवले. देडगावकर यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या सामाजिक कार्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला.