विविध प्रश्नांवर युवकांमध्ये जागृती केली जाणार -मोसिम शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- काँग्रेसच्या सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी शोएब आसीफअली मीर यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस सोशल मिडीयाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश समन्वयक सागर इरमल यांनी मीर यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले.
युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांच्या हस्ते मीर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भिंगार ब्लॉक अध्यक्ष भूषण चव्हाण, मयुर पाटोळे, धीरज शिंदे, प्रवीण गीते, तौफिक शेख, अरबाज बेग, तौफिक जहागीरदार, मेहराज शेख, मुन्ना शेख, सुयोग कवडे, नफीस शेख, जितेंद्र यादव, सिकंदर साहनी, धरमेंद्र चव्हाण, राहुल चव्हाण, शैलेश साहनी, जितेंद्र साहनी, आकाश लोखंडे, अमित लोखंडे, अनिल राव आदी उपस्थित होते.
सागर इरमल म्हणाले की, मोबाईल तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाचे युग निर्माण झाले आहे. देशातील सर्वात मोठा युवा वर्ग सोशल मीडियाशी जोडला गेलेला आह.े पक्षाची विचारधारा व कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी ठरत असून, यासाठी युवकांची फळी उभी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोसिम शेख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे कार्य घराघरा पर्यंत पोहचणार आहे. समाजात असलेले विविध प्रश्नांवर युवकांमध्ये जागृती होण्यासाठी कार्य केले जाणार आहे. काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी युवा वर्ग महत्त्वाची जबाबदारी उचलत असल्याचे स्पष्ट करुन या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या.
