• Tue. Oct 28th, 2025

मराठा समन्वय परिषद व मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन साजरा

ByMirror

Jun 6, 2024

शिवराज्याभिषेक दिन हा बहुजनांच्या स्वातंत्र्यतेचा दिवस -अनिता काळे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समन्वय परिषद व मराठा सेवा संघाच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जय जिजाऊ… जय शिवराय…च्या घोषणांनी परिसर दणाणले.


या अभिवादन सोहळ्याप्रसंगी मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश इथापे, माजी महापौर शिलाताई शिंदे, अलकाताई मुंदडा, जयश्री पुरोहित, संपूर्णा सावंत, सुरेखा कडूस, शोभाताई भालसिंग, आशा गायकवाड, कमल खेडकर, शोभा कांबळे, संगिता घोडके, प्रतिभा भिसे, नंदिनी गांधी, कमल खेडकर, शिवानी कर्डिले, सतीश इंगळे, उदय अनभुले, श्रीकांत निंबाळकर, अभियंता मनोज पारखे, पै. नाना डोंगरे, सुनिल सकट, सतीश बनकर, केशव हराळ, रिजवान शेख, अमोल लहारे, भिमराज कानगुडे, बापू साठे, विजय नवले, राजेंद्र कर्डिले, विजय जगताप, शशिकांत झांबरे आदी उपस्थित होते.


अनिता काळे म्हणाल्या की, शिवराज्याभिषेक दिन हा बहुजनांच्या स्वातंत्र्यतेचा दिवस आहे. महाराष्ट्रावरती साडेतीनशे वर्ष पारतंत्र्याची काळी छाया होती. प्रचंड निराशा, पारतंत्र्य, गुलामी, अवहेलना दु:ख आणि संकटांचा भीषण काळोख्यात सह्याद्रीच्या कुशीत शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मशाल पेटवली. अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करुन स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली. आजच्या युवकांपुढे असलेले आव्हाने व संकटे शिवरायांच्या आदर्शाने दूर होणार आहे. तर महिलांनी देखील राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेऊन शिवबाप्रमाणे आपल्या मुलांवर संस्कार रुजविण्याचे त्यांनी आवाहन केले.


सुरेश इथापे यांनी स्वतंत्रता, समता आणि बंधुता या तत्वावर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याची मुहुर्तमेढ रोवली. प्रत्येक सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटणारे राज्य व रयतेचा राजा उद्यास आला. या राजांच्या कारभाराने समाजाला एक आदर्श प्रस्थापित केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *