जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणला
मोरया प्रतिष्ठानचे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम दिशादर्शक -आ. संग्राम जगताप
नगर (प्रतिनिधी)- गुलमोहर रोड, सावेडी येथील मोरया युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. चौकात भव्य स्टेजवर राजवाड्याची सजावट करुन शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी युवकांनी जय भवानी… जय शिवाजी… च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आमदार संग्राम जगताप, पोलीस उपाधीक्षक अमोल भारती व तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन मदान, जनक आहुजा, रोहन मांडे, डॉ. अभिषेक वाही, विकी मुथा, हरजितसिंह वधवा, जस्मितसिंह वधवा, राजेंद्र कंत्रोड, अनुराधा खोसे, अमिता कंत्रोड, इंजि. केतन क्षीरसागर, प्रितपालसिंह धुप्पड, राजू जग्गी, मुन्नाशेठ जग्गी, रोहित सरणा, मनोज मदान, राकेश गुप्ता, दामोदर भटेजा, माजी नगरसेवक अमोल गाडे, जितू गंभीर, अजिंक्य बोरकर, इजि. रोहिदास सातपुते, अक्षय पालवे, अमित गटणे, कैलाश नवलानी, कुणाल गंभारी, जय दिघे, मयुर कुलथे, आकाश सोनवणे, स्विटी पंजाबी, गुलशन कंत्रोड, प्रदीप पंजाबी, मोहित पंजाबी, हितेश ओबेरॉय, सुजल काशीद, कार्तिक कराड, सतीश गंभीर, गजराजचे चव्हाण, सरस्वती सावंत, चंदा शिंदे, डॉ. खन्ना, जयकुमार रंगलानी, संगिता खरमाळे, जतीन आहुजा, महेश सातपुते, संपत नलावडे, राहुल ठोंबरे, सागर सारडा, निखील जरे, अमित खामकर, नारायण अरोरा, राजेंद्र गवळी, करन भळगट, अर्चना मदान, अभिलाषा मदान, करन भळगट, गोकुळ जगधने, ललित पोटे, रॉईस्टन पंडित, महेश लोंढे आदींसह युवक, परिसरातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मोरया युवा प्रतिष्ठान समाजात हिंदू संस्कृती जोपासून महापुरुषांचे विचार रुजविण्याचे कार्य करत आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्र उत्सव, गणेशोत्सव व महापुरुषांच्या जयंती उत्सवामध्ये राबविण्यात येणारे उपक्रम दिशादर्शक आहे. सावेडी उपनगरात या प्रतिष्ठानने विद्यार्थी, महिला व युवकांना व्यासपिठ निर्माण करुन दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्जुन मदान म्हणाले की, मोरया युवा प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकी जोपासून कार्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन उपनगर परिसरात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक चळवळ रुजविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.