अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बाबासाहेब बोडखे यांचा सत्कार करण्यात आला.
माध्यमिक शिक्षक सोसायटीत झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, एम.एस. लगड, सचिव राजेंद्र खेडेकर, वसंत दरेकर, चांगदेव कडू, हरिश्चंद्र नलगे, संभाजी गाडे, प्रशांत होन, छबुराव फुंदे, सुभाष भागवत, आत्माराम दहिफळे, जनार्दन सुपेकर, एस. सी. देशमाने, सुधाकर गांगर्डे, भरत लहाने, भगवान राऊत, नंदकुमार शितोळे आदी उपस्थित होते.
बोडखे यांचे शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या न्याय, हक्कासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची तळमळ व कार्याची दखल घेऊन त्यांना पुन्हा मिळालेली संधी अभिमानास्पद असल्याचे चांगदेव कडू यांनी सांगितले.
आप्पासाहेब शिंदे व एम.एस. लगड यांनी शिक्षक संघटनेत कार्य करताना बोडखे यांनी नेहमीच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बांधवाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार राहिला आहे. त्यांचे शिक्षण क्षेत्राच्या चळवळीत असलेल्या योगदानाची दखल घेऊन, योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी नियुक्ती झाल्याचे स्पष्ट करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना बोडखे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम केले जाणार असून, एकजुटीने शिक्षकांच्या प्रश्नावर कार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.