20 वर्षा खालील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या माध्यमातून 20 वर्षा खालील संघाची निवड चाचणी जाहीर करण्यात आली आहे. या निवड चाचणीसाठी खेळाडूंना ई-मेलद्वारे 2 मार्च पर्यंत माहिती पाठविण्याचे आवाहन संघटनेचे सचिव रौनप फर्नांडिस यांनी केले आहे.
20 वर्षा खालील जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणी पार पडणार आहे. आंतर-जिल्हा फुटबॉल स्पर्धेत हा संघ सहभागी होणार असून, या संघाला विक्टर जोसेफ प्रशिक्षण देणार आहे. या निवड चाचणीसाठी 2006, 2007 आणि 2008 मध्ये जन्मलेले खेळाडू खेळू शकणार आहेत. संघाच्या सराव सत्रांची सुरुवात लवकरच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
खेळाडूंना निवड चाचणीसाठी येताना मूळ जन्म प्रमाणपत्राची प्रत, मूळ आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो आणणे आवश्यक आहे. तर adfa197273@gmail.com या मेलवर कागदपत्रांसह माहिती सादर करावयाची आहे. अधिक माहितीसाठी 9890549981 व 7709070169 या नंबरवर संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.