नागपूर येथे करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व
नगर (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत मिनी गोल्फ मध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या खेळाडूंची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, सदर खेळाडू जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
मुलींमध्ये 14 वर्ष वयोगटात अमिथी राखडे, वैदही ठमके, 17 वर्षे वयोगटात श्रेया उंडे, आर्या देठे, आर्या बजड यांची, तर मुलांमध्ये 14 वर्ष वयोगट देव लोढा, वेदांत काळे, श्रीवर्धन धनगुडे, 17 वर्षे वयोगटात प्रसाद झरेकर, दुर्वेश कोतकर या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे प्राचार्य मंगेश जगताप, उपप्राचार्य शगुप्ता काझी, आशितोष नामदेव यांनी शुभेच्छा देवून त्यांचे कौतुक केले. या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू सीमा लाड, सचिन पठारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या खेळाडूंचे सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले आहे.